कोल्हापूरच्या अंबाबाईची कौमारी रुपात पूजा 

कोल्हापूर – शारदीय नवरात्रोत्सवात आज पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कौमारी रूपातील पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पाचव्या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम राहिला. त्यामुळे सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले.

कुमाराचे म्हणजेच स्कंदाचे स्वरुप अथवा शक्ती असलेले सप्तमातृकांपैकी एक. मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यामध्ये या देवतेचा उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली, त्यातील कौमारी ही एक मातृका आहे. देवीमहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला, गुंभ-निचुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या त्यात कौमारीचा उल्लेख येतो.

अंबाबाईची कौमारी रुपात पूजा (फोटो- सतेज औंधकर, कोल्हापूर)

कुमार-स्कंदाची शक्ती म्हणून हातामध्ये भाला घेतलेले देवीचे रूप आहे. मोराच्या पिसांनी सुशोभित तसेच कोंबडा, मोर आणि नागांनी परिवेष्टित असे स्वरुप असलेली अरण्यात एकांत सेवन करणारी अशी देवसेना स्वरुप कौमारी रूपातील श्री आंबाबईची आज पूजा बांधण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)