कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गूळ सौदे बंद… जोरदार वादावादी

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 3 दिवासांपासून गुळाचे सौदे बंद आहेत. हमालांनी अतिरिक्त वेळ काम करण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून गूळ सौदे बंद ठेवले आहेत. त्यामुळं कोट्यवधी रुपयांचा गूळ बाजार समितीत पडून राहिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी हमाल, व्यापारी आणि बाजार समिती यांच्यामध्ये सुरु असलेली बैठक ही फिस्कटली. यावेळी हमाल आणि व्यापारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.

अखेर संतप्त झालेले हमाल बैठकीतुन बाहेर पडले. त्यामुळं तणावात आणखीच भर पडली. बाजार समितीमध्ये अडीच कोटीहुन अधिक रक्कमेच गुळ पडुन असून अतिरीक्त काम करणार नसल्याच्या भुमीकेवर हमाल ठाम आहेत. तर व्यापारी हमालांनी गरज पडल्यास अतिरीक्त काम करावं या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळं गुळ उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)