कोहलीच्या खेळीने सहकाऱ्यांना प्रेरणा मिळेल- गेल 

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे बहुतेक प्रमुख फलंदाज अपयशी ठरले आहेत. परंतु कर्णधार विराट कोहलीने ज्या प्रकारे शानदार शतकी खेळी केली आहे, त्यामुळे या सहकाऱ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने व्यक्‍त केला आहे.
कोहलीची ही खेळी कर्णधाराला साजेशी होती, असे सांगून गेल म्हणाला की, वरच्या फळीतील सर्व फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कोहलीने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन ही खेळी केली हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात कर्णधाराने केलेल्या या झुंजार खेळीमुळे अन्य भारतीय खेळाडूंना स्फूर्ती मिळेल आणि त्याचा परिणाम मालिकेतील पुढच्या कसोटी सामन्यांमध्ये पाहायला मिळेल, असेही गेलने म्हटले आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने केलेल्या 80 धावांच्या खेळीची कोहलीच्या शतकाशी कशी तुलना करणार, असे विचारले असता गेल विनोदाने म्हणाला की, मी रूटची खेळी पाहिलीच नाही. कोहलीने रूटला चपळाईने धावबाद केले आणि त्यानंतर “माईक ड्रॉप’ प्रकाराची नक्‍कल केली इतकेच मी पाहिले.
इंग्लंडविरुद्धची ही कसोटी मालिका भारतीय संघ जिंकू शकेल काय, असे विचारले असता गेल म्हणाला की, तसे का घडू शकणार नाही? इंग्लंडचे खेळाडू काही “सुपरह्यूमन’ नाहीत. तीही माणसेच आहेत आणि भारतीय संघ त्यांना निश्‍चितपणे पराभूत करू शकतो. अर्थात इंग्लंडला त्यांच्या भूमीवर पराभूत करमे सोपे नाहीच. परंतु तसे प्रत्येक संघाबाबत म्हणता येईल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)