कोहलीच्या सेलिब्रेशनला आक्षेप नाही- जेनिंग्ज 

बर्मिंगहॅम: भारतीय कर्णधार विराट कोहलीने थेट फेकीवर इंग्लंडचा कर्णधार जो रूटला धावबाद करीत पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गाजविला. रूटला बाद केल्यानंतर विराट कोहलीने केलेल्या सेलिब्रेशनमुळे इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केला. परंतु इंग्लंडचा सलामीवीर कीटन जेनिंग्जचा कोहलीच्या सेलिब्रेशनवर कोणताही आक्षेप नाही.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतक झळकावल्यावर जो रूटने आपली बॅट हवेत भिरकावीत सेलेब्रेट केले होते. त्याचीच नक्‍कल करताना कोहलीने केलेले कालचे सेलिब्रेश ही त्याची शैली असून मैदानावरील रंगतदार क्षणी अशा गोष्टी घडतातच, असे सांगून जेनिंग्ज म्हणाला की, आम्हाला त्यात काही वावगे वाटले नाही. इंग्लंडची काल 3 बाद 216 अशा सुस्थितीतून पहिल्या दिवसअखेर 9 बाद 285 अशी घसरगुंडी झाली.
एका अर्थाने इंग्लंडने कसोटीवर वर्चस्व मिळविण्याची संधी दवडली. परंतु जेनिंग्जच्या मते खेळात अशा गोष्टी घडतातच. दोन्ही संघांची फलंदाजी झाल्याशिवाय आमची धावसंख्या चांगली आहे की अपुरी हे कळणार नाही, असे सांगून जेनिंग्ज म्हणाला की, जो रूटने केलेली खेळी अप्रतिम होती. त्याला बेअरस्टोने दिलेली साथ निर्णायक ठरली. त्यांच्या भागीदारीमुळेच ऍलिस्टर कूक अपयशी ठरूनही आम्ही दिवसअखेर 285 धावांची मजल मारू शकलो.
जेनिंग्जने अश्‍विनची तोंड भरून प्रशंसा केली. अश्‍विन हा एक उच्च दर्जाचा गोलंदाज असल्याचे सांगून जेनिंग्ज म्हणाला की, त्याचा टप्पा आणि दिशा अत्यंत अचूक असते. त्याने कूकला बाद केलेला चेंडू खरोखरीच अफलातून होता.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)