कोचरेवाडीत बिबट्या आलाय वस्तीला!

रेडकानंतर दोन कुत्र्यांचा फडशा, ग्रामस्थ भयभीत

चाफळ – चाफळ विभागातील कोचरेवाडी, ता. पाटण येथे बिबट्याची दहशत चांगलीच वाढली असून बिबट्याने सलग दुसऱ्या दिवशीही गावात येत दोन पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला. बिबट्याचा गावात रोजचा वावर वाढल्याने ग्रामस्थामधून भितीचे वातावरण पसरले आहे.

कोचरेवाडी येथील दगडू कोंडीबा मोहिते यांच्या एक वर्षाच्या रेडकावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी बिबट्याने पुन्हा एकदा गावात शिरुन बाळासो ज्ञानू मोहिते यांच्या दोन पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत त्यांचा फडशा पाडला. बिबट्या रोजच गावात येऊ लागल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेत आहे. सायंकाळी साडेसात वाजताच ग्रामस्थांवर भीतीपोटी घराची दारे लावून बसण्याची वेळ आली आहे. वनविभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याठिकाणी सापळा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)