जाणून घ्या पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तरतुदी

पुणे – महापालिकेचे 2019- 20 चे सुमारे 6 हजार 765 कोटीचे अंदाजपत्रक महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी शुक्रवारी मुख्यसभेत सादर केले.

समान पाणीपुरवठा योजना
‘समान पाणीपुरवठा योजने’मुळे पुणेकरांना २४ तास पुरेसे पाणी योग्य दाबाने मिळणार आहे. पाण्याची अनावश्यक साठवणूक व पर्यायाने पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून मीटर पद्धती राबविण्यात येणार आहे. पाण्याची गळती शोधून तेथे दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. पाण्याच्या वापराप्रमाणे बिल पद्धतीमुळे पाणी वापराचे लेखापरीक्षण होईल आणि वाया जाणार्‍या पाण्याचे अचूक प्रमाण ठरविता येईल. पाण्याचे समान वितरण करता यावे, यासाठी या योजनेत साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेने आता गती घेतली असून, सध्या ६० साठवण टाक्यांचे काम प्रगतिपथावर आहे. मार्च २०१९ अखेर २५ टाक्यांचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ३०१ कोटी ४० लाख रुपये)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भामा-आसखेड
पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता पूर्व भागाला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नगर रस्त्यावरील कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगाव शेरी, विमान नगर, खराडी, चंदननगर या भागाचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार असून, या भागातील नागरिकांची टँकरच्या खर्चातून सुटका होणार आहे. या प्रकल्पाचे ८०% काम पूर्ण झाले आहे. या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. योजनेचे काम पूर्ण करणे आणि सिंचन पुनर्स्थापना खर्च किंवा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १८५ कोटी रुपये)

गतिमान वाहतूक
पुणे मेट्रो रेल प्रकल्प
जलद, सुरक्षित प्रवासी सेवेच्या दृष्टीने शहरभर मेट्रो मार्गांचे जाळे तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. शिवसृष्टी ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रो मार्गांचे काम पूर्वनियोजनानुसार वेगाने सुरू आहे. पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात १९५.२६ किमीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे महानगर मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गिकेला तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रामवाडी ते लोहगाव विमानतळ आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचा डीपीआर करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ८ कोटी रुपये)

नगर रस्त्यासाठी वाहतूक आराखडा
केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. याचा विचार करून पुणे-नगर रस्ता हे एक एकक मानून ‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बससेवा या, ठिकठिकाणी उड्डाण पूल/ग्रेडसेपरेटर/भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना तातडीने करण्यात येणार आहेत.

नगर रस्त्यावरील महत्त्वाचे प्रकल्प
१. पुणे मेट्रोचे लोहगाव विमानतळ व वाघोलीपर्यंत विस्तारीकरण, डीपीआर तयार करणे (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी रुपये)
२. गोल्फ चौक उड्डाण पूल/ग्रेडसेपरेटर (अंदाजपत्रकात तरतूद : २० कोटी रुपये)
३. खराडी येथे उड्डाण पूल/ग्रेडसेपरेटर (अंदाजपत्रकात तरतूद : १५ कोटी रुपये)
४. कल्याणीनगर ते कोरेगाव पार्क उड्डाण पुलाचे विस्तारीकरण (अंदाजपत्रकात तरतूद : १५ कोटी रुपये)
५. येरवडा शास्त्रीनगर येथे उड्डाण पूल (अंदाजपत्रकात तरतूद : २० कोटी रुपये)
६. विश्रांतवाडी येथे केंद्र शासन व पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाण पूल (अंदाजपत्रकात तरतूद : २० कोटी रुपये)

सिंहगड रस्त्यावर उड्डाण पूल
राजाराम चौक ते फन टाइम थिएटरपर्यंत सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरात पाच चौक आहेत. सिंहगड रस्त्यावरून प्रतितास जाणार्‍या वाहनांची संख्या आठ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे या चौकांमधील वाहतूक कोंडीत वाहनचालकांना अडकून पडावे लागते. त्यामुळे वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. सिंहगड रस्त्यावरून जाणार्‍या हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, यासाठी उड्डाण पूल बांधण्याची योजना आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ३० कोटी रुपये)

पाषाण-सूस उड्डाण पूल
मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाषाण-सूस येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये नोकरीनिमित्त प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. या भागात सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतो. वाहतूक कोंडीचे निवारण करण्यासाठी पाषाण-सूस येथे उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. उड्डाण पूल प्रकल्पाच्या संकल्पचित्राला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाले आहे.

धायरी फाटा येथे जंक्शन पूल
सिंहगड रस्त्यावर सणस शाळेजवळ धायरी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खडकवासला रस्त्याकडे जाणारा उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलाखाली असलेल्या चौकातील वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. त्यामुळे या उड्डाण पुलावरुन इंग्रजी ‘वाय’ आकाराचा धायरीकडे जाणारा जंक्शन पूल उभारण्यात येणार आहे.

वाहनतळांची निर्मिती
शहराच्या विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी होते. पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भरच पडते. महापालिकेने पार्किंगचे धोरण निश्‍चित केले असून, या धोरणााला सुसंगत शहराच्या विविध भागात वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर रेव्हेन्यू कॉलनी व मॅक्डोनोल्ड शेजारी, दत्तवाडी, बाणेर, वारजे, विमाननगर, कोंढवा बुद्रुक आदी परिसरातील उपलब्ध ऍमेनिटी स्पेसवर वाहनतळ निर्मिती करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २९ कोटी ५४ लाख रुपये)

रिंग रोड, नवे रस्ते
एचसीएमटीआर प्रकल्प
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ‘उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग’ (एचसीएमटीआर) प्रकल्प १९८७ च्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता. शहरातील प्रमुख साठ रस्त्यांना जोडणारा ३६ किलोमीटर लांबीचा व २४ मीटर रुंदीचा हा प्रकल्प आहे. दोन्ही बाजूस तीन याप्रमाणे सहा मार्गिका प्रस्तावित आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी उभारणीचे पर्याय सुचवून निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एका सल्लागार कंपनीकडे देेण्यात आली आहे. या प्रकल्पाला या वर्षी गती देण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २०० कोटी रुपये)

महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तरतुदी
कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर होणारी वाहनांची गर्दी, वाढलेली लोकसं‘या यामुळे वाहतुकीची कोंडी होते. या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिका हद्दीपर्यंत ८४ मीटर रुंद विकास आराखड्यातील रस्त्याची आखणी करण्यात आली आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ५५ कोटी ३० लाख रुपये)

शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नदीपात्रातून शिवणे-खराडी असा अठरा किलोमीटरचा रस्ता करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. शिवणे ते म्हात्रे पूल, म्हात्रे पूल ते संगमवाडी आणि संगमवाडी ते खराडी या तीन टप्प्यात हे काम होईल. (अंदाजपत्रकात तरतूद : २२ कोटी १२ लाख रुपये)

कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने ‘बालभारती-पौड फाटा’ रस्त्याची निर्मिती महत्त्वाची आहे. बालभारती ते पौड फाटा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने पर्यावरण आघात मूल्यांकन आणि वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २८ लाख रुपये)

ट्रॅफिक वॉर्डन
रस्त्यावरील चौकांची संख्या, वाहतूक कोंडी होण्याची ठिकाणे, सिग्नलचा कालावधी यांचा अभ्यास करून सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. शहरामध्ये मेट्रो, बीआरटी आणि ठिकठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असून वाहनचालकांचा वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना झेब्रा पट्‌ट्यांवरून रस्ता ओलांडताना गैरसोय होते. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत व्हावी, वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि पादचार्‍यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वर्दळीच्या मुख्या चौकांमध्ये १०० ट्रॅङ्गिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी २० लाख रुपये)

सक्षम सार्वजनिक वाहतूक
पीएमपीएमएलसाठी नवीन बसेस
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) नुकत्याच पर्यावरणपूरक व किफायतशीर अशा २५ ई-बसेस ताफ्यात दाखल केल्या. पाचशे ई-बसेस टप्प्याटप्प्याने आणि ८०० सीएनजी बसेस घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. महिलांच्या ‘तेजस्विनी’ बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, लवकरच आणखी २७ ‘तेजस्विनी’ बसेसची खरेदी केली जाईल. (अंदाजपत्रकात तरतूद : ई बसेससाठी १०५ कोटी रुपये आणि ८०० बसेससाठी ७५ कोटी रुपये)

दृष्टिहीनांसोबतच्या मदतनीसाला सवलत
महापालिकेतर्फे दृष्टिहीनांना प्रवासासाठी ‘पीएमपीएमएल’चा मोफत पास दिला जातो. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या मदतनीसाला किंवा नातेवाईकाला प्रवासाचे पूर्ण भाडे आकारले जाते. या भाड्याचा भार दृष्टिहीन व्यक्तीलाच सहन करावा लागतो. अनेकदा अंधत्त्वामुळे रोजगाराचे कोणतेच साधनही नसते. दृष्टिहीनांसोबत असलेल्या मदतनीसाला रेल्वे आणि एसटीत सवलतीचा पास दिला जातो. त्याच धर्तीवर ‘पीएमपीएमल’च्या तिकिटात पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करणार्‍या शहरातील दृष्टिहीन पासधारकांची संख्या १५०० इतकी आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. (अंदाजपत्रकात तरतूद : ३० लाख रुपये)

नदीसुधारणा-काठ सौदर्यीकरण
मुळा-मुठा शुद्धीकरण
‘राष्ट्रीय नदी संवर्धन योजने’अंतर्गत मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करण्याचा प्रकल्प (जायका) हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ९९०.२६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले असून, सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांत प्रतिदिन २७७ दशलक्ष लिटर क्षमतेची ६ मैलापाणी शुद्धीकरण केंद्र व ७० किलोमीटरच्या मलवाहिन्या विकसित करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद : ८० कोटी रुपये)

नदीकाठ सुधारणा प्रकल्प
पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड या हद्दीतून वाहणार्‍या ४४ किलोमीटर लांबीच्या मुळा-मुठा नदीच्या काठाचे सुशोभीकरण व विकसन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी उपरोक्त संस्थांनी मिळून ‘एसपीव्ही’ स्थापन करण्यासाठी प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे, अंतिम प्रकल्प अहवाल तयार करणे, नदीशी संलग्न विविध विभागांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’, एसपीव्ही कंपनी स्थापन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद : ७ कोटी रुपये)

नैसर्गिक जलस्रोतांचा विकास
पुणे महापालिका हद्दीत आणि नव्याने समाविष्ट गावांमध्ये तलाव, विहिरी, झरे आदी नैसर्गिक जलस्रोतांची सं‘या मोठी आहे. सध्या यांपैकी बहुतेक जलस्रोत फारसे वापरात नाहीत. या जलस्रोतांचा विकास केल्यास निसर्गातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्‍या पाण्याचा दैनंदिन वापरासाठी उपयोग करता येईल. या दृष्टिने समाविष्ट गावांमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या विहिरींवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे, आधुनिक तंत्राचा वापर करून तलावांचे शुद्धीकरण आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी ७० लाख रुपये)

कात्रज तलाव प्रदूषणमुक्त
भिलारेवाडी, मांगडेवाडी व गुजर-निंबाळकरवाडी या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये मुख्य मलवाहिन्या विकसित करण्यासाठी  मुख्य सभेची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे नानासाहेब पेशवे तलाव (कात्रज) प्रदूषणमुक्त होईल. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये सांडपाणी संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ३ कोटी ५० लाख रुपये)

ड्रेनेज गाळ काढण्यासाठी विशेष यंत्रणा
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्ङ्गत डे्रनेजमधील गाळ काढण्याचे काम केले जाते. या कामाचे उत्तम नियोजन करून स्वच्छता अभियान यशस्वी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक प्रभागात जेटिंग मशिन, वाहन व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या रस्त्यांबरोबर छोटे रस्ते व गल्लीबोळातील ड्रेनेज सफाई करणे सुलभ होईल. प्रत्येक प्रभागात स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध झाल्याने ड्रेनेज सफाईची कामे वेळेत व प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतील. (अंदाजपत्रकात तरतूद : ४ कोटी रुपये)

सर्वांसाठी वैद्यकीय सुविधा
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय
पुणे शहरात आरोग्य सेवेसह बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर पुणे महापालिकेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यासाठी मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिकांना परवडणार्‍या दरात किंबहुना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १० कोटी रुपये)

महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्ङ्गत शहरात १९ प्रसूतिगृहे चालविली जातात. या प्रसूतिगृहांमध्ये कर्करोगाचे निदान करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. सध्या महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याने मृत्यू होणार्‍या महिलांची सं‘या मोठी आहे. प्राथमिक स्तरावर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्ण आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. महापालिकेच्या सर्व १९ प्रसूतिगृहांमध्ये ‘स्मार्ट स्कोप’ हे कर्करोगाचे निदान करणारे उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना ही सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)

सुरळीत औषध पुरवठ्यासाठी सॉफ्टवेअर
गाडीखाना या मध्यवर्ती केंद्रातून महापालिकेच्या विविध रुग्णालयांना आवश्यक औषधांचा पुरवठा केला जातो. औषधनिहाय शिल्लक साठा, कोणत्या रुग्णालयात कोणत्या औषधांचा किती साठा आहे त्याची माहिती घेऊन, त्यानुसार पुरवठा करण्याच्या प्रचलित पद्धतीत रुग्णालयांमध्ये वेळेवर औषधांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जीवनावश्यक औषधांची टंचाई निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन मनपाच्या सर्व रुग्णालयांना आवश्यक असणारा औषध पुरवठा सुरळीतपणे व्हावा व औषधांची टंचाई भासू नये यासाठी ‘स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे.

राजीव गांधी रुग्णालयात डायग्नोसिस सेंटर
मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) या तंत्रामुळे अनेक आजारांचे निदान लवकर आणि अचूक होते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात या तंत्राचा वापर वाढला आहे. डॉक्टर बहुतेकदा एमआरआय करायचे असे सुचवितात. परंतु एमआरआय सारखी निदान पद्धती खर्चिक आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात विविध आजारांच्या निदान चाचण्या करता याव्यात यासाठी येरवडा येथील ‘राजीव गांधी रुग्णालयात डायग्नोसिस सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. एमआरआय, क्ष किरण (एक्स रे), सोनोग्राफी, सिटीस्कॅन आदी सुविधा तेथे अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद : १० कोटी रुपये)

पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजने’अंतर्गत मिळकत कर भरणार्‍या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसदाराला विम्यापोटी पाच लाख रुपये मिळत होते. या योजनेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. या योजनेत निवासी मिळकतकर धारकाच्या कुटुंबात तो स्वतः, त्याची पत्नी किंवा पती, त्याच्यावर अवलंबून असलेली २३ वर्षांखालील पहिली दोन अविवाहित अपत्य, मिळकतकर दात्याचे आई व वडील अशी
कुटुंबाची व्या‘या करण्यात आली आहे. नवीन योजनेत समाविष्ट करण्यात आलेले लाभ पुढीलप्रमाणे
१. मिळकतकर धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपये
२. मिळकतकर धारकाच्या पत्नीचा किंवा पतीचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये
३. मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या २३ वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यास अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मूळ विमा रकमेच्या
५०% म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये
४. मिळकत धारकाच्या आई किंवा वडलांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख पन्नास हजार रुपये
५. कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला एका वर्षामध्ये जास्तीत जास्त एक
लाख रुपये दवाखान्यातील उपचारासाठी दिले जातील
६. वरील पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण एका कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला वर्षातून एकदा वापरता येईल
७. अपघाताने पूर्णतः अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये किंवा अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार भरपाई देण्यात येईल. (अंदाजपत्रकात तरतूद : ७ कोटी रुपये)

मनपाच्या प्रत्येक विभागासाठी पुष्पक शववाहिनी
निधन झालेल्या व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएल) पुष्पक शववाहिनी सेवा दिली जाते. या सेवेसाठी दररोज १२ ते १८ कॉल येतात. सध्या पीएमपीएलकडे तीन पुष्पक शववाहिन्या आहेत. मृत व्यक्तीचे घर ते स्मशानभूमी आणि परत घर अशी सेवा असेल तर दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. पुष्पक गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन दोन पुष्पक शववाहिन्या घेतल्या जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाच विभागांना प्रत्येकी एक याप्रमाणे पाच गाड्या उपलब्ध होतील. (अंदाजपत्रकात तरतूद : ५० लाख रुपये)

भटके व मोकाट कुत्र्यांची नसबंदी
पुणे शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता तो कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी नायडू हॉस्पिटलजवळील केंद्रात दर वर्षी १२ हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाते. या प्रकल्पाची क्षमता वाढवून दरवर्षी १८ हजार कुत्र्यांची नसबंदी केली जाईल. (अंदाजपत्रकात तरतूद : ४ कोटी रुपये)

प्राणी उपचार व संगोपन केंद्र
पाळीव प्राणी किंवा शहरात आढळणारे पशु-पक्षी यांची संख्या मोठी आहे. शहर आणि परिसरात वन्य विभागाच्या जमिनी असल्यामुळे या ठिकाणच्या पशु-पक्ष्यांचा वावर असतो. सध्या पाळीव प्राणी किंवा पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सुविधा आहे. परंतु ते शहराच्या एका भागात असल्याने अन्य ठिकाणी तातडीने उपचाराची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन विश्रांतवाडी किंवा मुंढवा परिसरात प्राणी उपचार व संगोपन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी रुपये)

प्रकाश गोळे पक्षी संवर्धन योजना
पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगा आणि दख्खनच्या पठाराचा काही भाग पुण्याजवळ असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे अधिवास पुणे शहरात बघायला मिळायचे. वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे शहर आणि परिसरातील पक्षिविश्‍व समृद्ध होते. आजही शहरामध्ये दीडशेहून अधिक जातीचे पक्षी वास्तव्यास आहेत. परंतु निसर्ग साखळीत महत्त्वाची भूमिका असणारे अनेक पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत पक्षी संवर्धनासाठी अनेक जण धडपड करीत असतात. अशा पक्षिप्रेमींना बळ देण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने ‘प्रकाश गोळे पक्षी संवर्धन योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेत पक्षी संवर्धन संमेलनाचे आयोजन केले जाईल.

वैशिष्ट्यपूर्ण उद्याने, पर्यावरण संवर्धन
वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्याने
हिंगणे खुर्द येथील तुकाई माता उद्यानात चार एकर क्षेत्रावरील लिली पार्क व सात एकर जागेवरील रॉक पार्क, वडगाव शेरीत दिव्यांगासाठी अडथळा विरहित ‘बॅरीअर फ्री ऍक्सेस’ व वैशिष्ट्यपूर्ण पाम उद्यान, कोथरूडच्या हिंदुहृदयसम‘ाट बाळासाहेब ठाकरे उद्यानात दृकश्राव्य माध्यमातून स्वतःविषयी माहिती देणारी झाडे ‘टॉकिंग ट्रीज’, स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी विमाननगर परिसरातील ‘वेस्ट पार्क’, कळस धानोरीत नागरी वन उद्यान आणि वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारे इंद्रप्रस्थ उद्यानातील ‘ट्रॅफीक पार्क’ अशी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्याने विकसित केली जाणार आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.

ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा संशोधन केंद्र
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा तयार होतो. या कचर्‍याची विल्हेवाट आणि पुनर्वापर या दृष्टीने प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. ई-कचर्‍यातील पारा, शिसे याबरोबरच कॅडमियम, ब्रोमिनेटेड फ्लेम रिटारडंट्‌स, हेक्झावॅलंट क‘ोमियम यांसारखे हानिकारक घटक थेट पर्यावरणात मिसळतात. प्लॅस्टिक कचर्‍यामुळे सुद्धा नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या कचर्‍याचे संकलन, त्यांचा कमीत कमी वापर, पुनर्वापर, हानिकारक पदार्थांची विल्हेवाट लावणे आदीवर संशोधन करण्यासाठी पुणे शहरात ई-कचरा व प्लॅस्टिक कचरा संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी रुपये)

मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांसाठी ई-मोटारी
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात नुकत्याच २५ ई-बसेस दाखल झाल्या आहेत. ई-बसेस डिझेलवर चालणार्‍या बसेसच्या तुलनेत किङ्गायतशीर व पर्यावरणपूरक आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकेतील पदाधिकारी व अधिकार्‍यांसाठी भाडेतत्त्वावर ई-मोटारी घेण्यात येणार आहेत. तसेच ई-मोटार चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून पर्यावरणपूरक वाहन वापराचा संदेश पुणेकरांपर्यंत जाईल. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)

कल्पवृक्ष-कार्बन न्यूट्रल पुणे (बांबू लागवड)
बांबूची लागवड पर्यावरण पूरक आणि आर्थिक उत्पन्न देणारी आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील मोकळ्या जागा, ऍमिनेटी स्पेसेस, बीडीपी क्षेत्र, उद्याने, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र आदी ठिकाणच्या ५० एकर जागेवर बांबू विकास महामंडळ, नागपूर यांच्याशी करार करून प्रायोगिक तत्त्वावर ‘कल्पवृक्ष-कार्बन न्यूट्रल पुणे’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)

सर्व उद्याने विद्यार्थ्यांसाठी खुली
पुणे शहरात शालेय व महाविद्यालयन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देशाच्या विविध भागांतून विद्यार्थी शहरात येतात. छोट्या घरांमुळे शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा अपुरी पडते. बाहेरगावांहून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध होत नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी शहरातील सर्व १९१ उद्याने सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत खुली करण्यात येणार आहेत. ही सुविधा छायाचित्रकार, चित्रकार, शिल्पकार आदींना ही उपलब्ध असेल. यासाठी उद्यान विभागाचे ओळखपत्र घेणे आवश्यक असणार आहे.

शहरी जलयुक्त शिवार
पुणे महापालिका व नव्याने समाविष्ट गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टेकड्या व वन विभागाच्या जमिनी आहेत. भांबुर्डा वन विभागातील वेताळ टेकडी, पाचगाव-पर्वती, वारजे टेकडी, महात्मा टेकडी, सिंहगड रस्त्यावरील टेकडी, गंगाधाम, हडपसर, धानोरी आदी भागांमध्ये पाणी साठवता येईल किंवा भूजल पातळी वाढवता येईल अशा जमिनी आहेत. पुणे वन विभागाबरोबर संयुक्त प्रकल्प राबवून शहरी जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी रुपये)

टाकाऊ वस्तूंचे पुनर्चक्रीकरण प्रशिक्षण केंद्र
टाकाऊ वस्तूंचे पुनर्चक्रीकरण करून टिकाऊ वस्तू निर्मिती करण्याचे प्रशिक्षण महिला बचतगट आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुणे शहरात प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये वापरलेल्या, बंद पडलेल्या, बिघडलेल्या वस्तू व उपकरणांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे प्रयोग शिकविण्यात येणार आहेत. या इमारतीची उभारणी करताना अधिकाधिक टाकाऊ साहित्याचा उपयोग केला जाणार आहे. ‘स्वच्छ भारत’ या योजनेच्या जनजागृतीसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)

घनकचरा व्यवस्थापन, वीजनिर्मिती
रामटेकडी येथे कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प
रामटेकडी हडपसर येथे कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पामध्ये दररोज ७५० मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष वीजनिर्मिती पुढील वर्षी होऊ शकेल. या प्रकल्पातून १३.५ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.

उरुळी फुरसुंगी येथे बायोमायनिंग व भू-भराव टाकणे
उरुळी फुरसुंगी कचरा डेपोवर सुमारे ९ लक्ष मेट्रिक टन इतका कचरा साठलेला आहे. या कचर्‍यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. बायोमायनिंग प्रक्रियेने या कचर्‍याची पुढील चार वर्षांत विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच १० एकर जागेवर भू-भराव टाकणे व देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १० कोटी ५० लाख रुपये आणि ७० लाख रुपये)

यांत्रिकी पद्धतीने कचर्‍याचे वर्गीकरण
शहरात निर्माण होणार्‍या कचर्‍यापैकी सुमारे ५५० मेट्रिक टन कचर्‍यावर दररोज यांत्रिकी पद्धतीने वर्गीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. हडपसर-रामटेकडी प्रकल्पात २०० मेट्रिक टन, केशवनगर, लोहगाव, आंबेगाव प्रकल्पात प्रत्येकी १०० मेट्रिक टन आणि बिबवेवाडी प्रकल्पात ५० मेट्रिक टन कचर्‍यावर वर्गीकरणाची प्रक्रिया करण्यात येईल. भूगांव व फुरसुंगी येथे नवीन रॅम्प बांधण्याची योजना आहे. त्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.

स्वच्छ व सुंदर प्रभाग स्पर्धा
आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करून स्वच्छ व सुंदर प्रभाग स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रभागातील सर्वसाधारण स्वच्छता, घन कचर्‍याचे व्यवस्थापन, सुशोभिकरण आदी निकषांवर ही स्पर्धा होणार आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्‍या प्रभागांना विशेष प्राधान्य दिले जाईल. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)

समाविष्ट गावांमध्ये विकासकामे
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये विविधप्रकारची विकासकामे करण्यात येणार आहेत. रस्ते व पदपथ निर्माण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य सुविधा, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, शाळांमध्ये मूलभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृहांच्या सुविधा, मैलापाणी शुद्धीकरण, नाल्यांची स्वच्छता, पथदिवे बसविणे आदी विकासकामे केली जातील. (अंदाजत्रकात तरतूद : १९२ कोटी रुपये)

गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा सुविधा
ई-लर्निंग व ई-ग्रंथालय प्रकल्प
वानवडी येथील महादजी शिंदे शाळेच्या जुन्या इमारतीच्या जागी ई-लर्निंग स्कूल बांधले जाणार आहे. वडगाव शेरीत ई-लर्निंग स्कूलसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. मनपा शाळांतील वर्ग खोल्यांमध्ये ई-लर्निंगची सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ई-ग्रंथालये पहिलंदाच सुरू करण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद : ई-लर्निंग १३ कोटी ६० लाख रुपये आणि ई-लायब‘री ५ कोटी रुपये)

मनपा शाळांचे गुणवत्ता मूल्यांकन
महापालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व विद्यालयांचे शासन, प्रशासन, नेतृत्व आणि अध्ययन व अध्यापन अशा चार विषयांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता पद्धतीनुसार चाचणी प्रक्रियेवर आधारित मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाईल. मूल्यांकनानुसार विद्यालयातील गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. महापालिका शाळांचे पहिल्यांदाच गुणवत्ता मूल्यांकन करण्यात येणार आहे.

मनपा शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाच्या सर्व १३६ इमारतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सध्या महापालिकेच्या दहा शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेचे नियंत्रण मुख्याध्यापकांच्या कार्यालयातून करण्यात येर्ईल. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी २६ लाख रुपये)

डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा
डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा उपक‘माअंतर्गत ’हापालिकेच सर्व शाळांना अभ्यासपूरक पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावर राष्ट्रप्रेमाचे संस्कार व्हावेत या हेतूने वाचन प्रेरणा उपक‘माला चालना दिली जाईल. त्या दृष्टीने शाळांना पुस्तके दिली जातील.

स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा
विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी व शिस्त लागावी या हेतूने पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळांमध्ये दर तीन महिन्यांनी ‘स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा’ घेण्यात येणार आहे. वैयक्तिक स्वच्छता, शाळा व परिसरातील स्वच्छता, स्वच्छतागृह, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केलेले विविध उपक‘म या निकषांच्या आधारावर ही स्पर्धा घेण्यात येईल. यशस्वी शाळांना विभागनिहाय बक्षिसे देण्यात येतील.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यानमाला
इयत्ता दहावी म्हणजे शालेय जीवनातील शेवटचे वर्ष आणि दहावीची परीक्षा जीवनातील महत्त्वाची परीक्षा म्हणून ओळखली जाते. करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि समाजाचे दहावीच्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष असते. या परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाता यावे यासाठी अभ्यास करण्याचे तंत्र व मंत्र, परीक्षा पद्धती, ताण-तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना, करिअरची निवड याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मनपा शाळांतील मैदाने विकसित करणे
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने महापालिका शाळांतील दोन हजार चौरस फूटांपेक्षा मोठी असणारी २३ मैदाने क्रीडांगणे म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. कबड्डी, खोखो, मल्लखांब, ऍथलेटिक्स, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आदी खेळांसाठी उपयुक्त ठरतील अशा सर्व सुविधा या मैदानांवर उपलब्ध असतील. खेळांसाठी आवश्यक साहित्य पुरविले जाणार असून, खेळाडूंंना प्रशिक्षण देण्यासाठी मान्यताप्राप्त क‘ीडा संस्थांच्या माध्यमांतून अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जातील. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)

मनपा शाळा व उद्यानांमध्ये योग केंद्र
योग ही भारताची प्राचीन ज्ञानशैली आहे. शारीरिक व्यायाम, भावनात्मक समतोल आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी योग महत्वाचा आहे. योगासनाचे महत्व लक्षात घेऊन त्याबाबत जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने २०१५ मध्ये २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन‘ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सर्व १३६ इमारतींमध्ये व सर्व उद्यानांमध्ये योग प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योग प्रशिक्षकांच्या नियुक्त्या करुन सकाळी ५.०० ते ७.०० आणि संध्याकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत नागरिकांना ही केंद्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व प्राणायामाचे शिक्षण दिले जाणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी रुपये)

शशिकांत भागवत क्रीडा संग्रहालय व माहिती केंद्र
बाबुराव सणस मैदानाच्या परिसरात क्रीडा संग‘हालय व क्रीडा माहिती केंद्र विकसित करण्यात येणार आहे. विविध खेळ, त्यांचा इतिहास, खेळाडू, प्रशिक्षण, करिअर संधी, क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी यांची अद्ययावत माहिती, क्रीडा साहित्य, संदर्भग्रंथ, पुस्तके, ई-लायब‘री, छायाचित्रे, ध्वनिचित्रङ्गिती, मॉडेल्स या माध्यमांतून नागरिकांना kडा विश्‍वाची माहिती व्हावी यासाठी हे केंद्र विकसित करण्यात येणार आहे. या क्रीडा संग्रहालय व माहिती केंद्राला क्रीडा पत्रकार शशिकांत भागवत यांचे नाव देण्यात येणार आहे.

कल्याणीनगर क्रीडा अकादमी
क्रीडा अकादमीत आठ ते चौदा वर्षे वयोगटातील मुला-मुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या संस्थेच्या चाचणीद्वारे निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या मुला-मुलींना आठ ते दहा वर्षे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे हे अकादमीचे उद्दिष्ट आहे. कुस्ती, बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, जलतरण, टेबल टेनिस या वैयक्तिक आणि कबड्डी, व्हॉलिबॉल, हॉकी, खोखो या सांघिक खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कल्याणीनगर भागात क्रीडा अकादमीची उभारणी करण्यात येईल. (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी रुपये)

शिवसृष्टी, स्मारके, वारसा प्रकल्प
शिवसृष्टी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित कायमस्वरूपी प्रदर्शन ‘शिवसृष्टी’च्या माध्यमातून उभे राहणार आहे. अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकास साजेशी ‘शिवसृष्टी’ पुणे महापालिकेच्या वतीने चांदणी चौकातील जैवविविधता उद्यानाच्या (बीडीपी) ५० एकर जागेत उभारण्यास राज्य सरकारने विशेष बाब म्हणून परवानगी दिली आहे. शिवसृष्टीच्या निर्मितीला वेग देण्यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २६ कोटी ४० लाख रुपये)

गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर स्मारक
आपल्या अलौकिक प्रतिभेने आणि सिद्धहस्त लेखणीने मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी समृद्ध करणारे ‘आधुनिक वाल्मिकी’ गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे उचित स्मारक करण्याची योजना आहे. त्यासाठी कोथरूड येथील महात्मा सोसायटीमधील ‘एक्झिबिशन सेंटर’मध्ये जागा निश्‍चित करण्यात आली आहे. गीतरामायण दालन, गदिमांच्या वैयक्तिक वस्तूंचे दालन, गदिमांच्या चित्रपटांचे दालन, गदिमांच्या साहित्याचे दालन, डिजिटल स्मारक, प्रेक्षागृह, कलादालन, उद्यान अशा स्वरूपाचे हे स्मारक असेल. (अंदाजपत्रकात तरतूद : ५० लाख रुपये)

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके आदींना प्रेरणा देणार्‍या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील त्यांच्या समाधी स्थळावर स्मारक उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. राज्य सरकारने विकास आराखड्यात हे आरक्षण कायम केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात वीर लहुजींचे योगदान मोलाचे होते. त्यांचे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे. वीर लहुजींच्या स्मारकाची प्रकिया लवकरच सुरू होणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ३ कोटी ५० लाख ५० हजार रुपये)

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास
पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज रंगमंदिर, मनोरंजनाच्या सुविधा, वाहनांसाठी मुबलक जागा यांच्या समावेशाने बालगंधर्व रंगमंदिर पुण्यासह देशातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्याची भूमिका आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी वास्तू विशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार ५२ वास्तू विशारदांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पुनर्विकसनचा निर्णय घेण्यासाठी सांस्कृतिक, कला, वास्तुरचना या क्षेत्रांतील दिग्गजांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्या सल्ल्याने पुनर्विकास आराखडा अंतिम केला जाणार आहे. (अंदाजपत्रकीय तरतूद : ११ कोटी ४० लाख रुपये)

शहीद सौरभ फराटे स्मारक
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पुण्यातील जवान सौरभ फराटे यांना डिसेंबर २०१६ मध्ये वीरगती प्राप्त झाली. शहीद सौरभ फराटे यांचा पराक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे. त्यांच्या पराक्रमाची स्मृती जतन करण्यासाठी हडपसर परिसरात भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

वारकरी सांस्कृतिक भवन
पुणे महापालिका हद्दीत हडपसर येथे वारकरी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी या हेतूने हे भवन उभारले जाईल. कमलेश बहादूरसिंग झाला यांनी या प्रकल्पासाठी महापालिकेला स्वतःच्या मालकीची जागा दिली आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी १७ लाख ५० हजार रुपये)

हज हाउस
पवित्र हज यात्रेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून जाणार्‍या भाविकांची सं‘या मोठी असते. अनेकदा भाविकांना मुंबईतील हज हाउसमध्ये निवासाची व्यवस्था होऊ शकत नाही. अशा भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी पुणे शहरात निवास व्यवस्था करता यावी यासाठी महापालिकेच्या वतीने हज हाउस उभारण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी १७ लाख ५० हजार रुपये)

कला प्रदर्शन-संवर्धन केंद्र
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख आहे. शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, अभिनय, नाटक, चित्रकला, व्यंगचित्रकला, शिल्पकला आदी विविध क्षेत्रांमध्ये पुण्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत दिले. विविध कला प्रकारांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, सराव करणार्‍या कलाप्रेमींची संख्या मोठी आहे. आपली कला प्रदर्शित करण्यासाठी स्थानिक स्तरावर व्यासपीठ असावे अशी कलाकारांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाच विभागांमध्ये प्रत्येकी एकाप्रमाणे अस्तित्त्वातील इमारतीत किंवा नव्याने उभारलेल्या इमारतीत कला प्रदर्शन-संवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद : १ कोटी रुपये)

वारसा जतन संवर्धन
नाना वाडा येथील पेशवेकालीन दगडी इमारतीची उर्वरित टप्प्यातील जतन संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. तसेच विश्रामबागवाडा येथील तिसर्‍या टप्प्यातील जतन व संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. महात्मा फुले मंडई येथे जतन व संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. विश्रामबागवाडा येथील पुनवडी ते पुण्यनगरी प्रदर्शनाचे नूतनीकरण, नाना वाडा येथील पेशवेकालीन दरबार हॉल येथे नाना ङ्गडणवीस यांच्या जीवनावर आधारित कायमस्वरूपी प्रदर्शन करण्याची योजना आहे. नाना वाडा येथे क्रांतीकारकांच्या जीवनचरित्रावर आधारित कायमस्वरूपी संग्रहालय उभारणार आहे. पुणे शहरात हेरिटेज वॉक, मिनी बस टूर हे उपक‘म सुरू करण्यात येतील. त्या माध्यमातून शहरातील सांस्कृतिक वारसा आणि त्याची ओळख पर्यटकांना होऊ शकेल. त्यासाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.

सर्वांसाठी परवडणारी घरे
प्रधानमंत्री आवास योजना
केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याचे पुणे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामधून परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. अल्प उत्पन्न गटातील सदनिका बांधण्यासाठी हडपसर, खराडी, वडगाव (खुर्द) या परिसरातील आठ ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६,२६४ परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यास मुख्य सभेने मान्यता दिली आहे. खराडी, हडपसर भागातील प्रकल्पांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे. उर्वरित प्रकल्पांच कामाची प्रक्रिया सुरू आहे. सार्वजनिक-खासगी तत्त्वावर खासगी विकसकांमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले असून, या वर्षी आणखी दहा हजार घरकुलांची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ७० कोटी रुपये)

सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी
सौरऊर्जा पार्क
विजेची वाढती मागणी व पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून अपारंपरिक ऊर्जास्त्रोत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौरऊर्जा निर्माण करण्याचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारने सन २०२० पर्यंत देशात अपारंपरिक उर्जास्रोताला प्राधान्य दिले आहे. या योजनेला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सौरऊर्जा पार्क विकसित करण्यात येणार असून, महापालिका व शासनाच्या उपलब्ध असणार्‍या सर्व मिळकतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महापालिकेचा विजेवर सरासरी २५५ कोटी रुपये खर्च होतो. या खर्चातून ५० कोटी रूपांचे सौरऊर्जा प्रकल्प उभारून या वर्षीपासून दरवर्षी २० कोटी रूपांची बचत केली जाणार आहे. या प्रकल्पावर टप्प्याटप्याने काम करून विजेचा खर्च शून्यावर आणणचे नियोजन आहे.

स्मार्ट सिटी
स्मार्ट सिटी प्रकल्प
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्तांचे सुशोभीकरण व पुनर्रचना, स्वारगेट व बालेवाडीत ट्रान्सपोर्ट हब, युवकांचे सबलीकरण करण्यासाठी लाइट हाउस, समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पुणे आयडिया फॅक्टरी, नागरिकांच्या सहभागातून विकास कामे, बस वाहतुकीची कार्यक्षमता वाढविणे, मोबाईल ऍपद्वारे प्रवासी माहिती, ई-बस, ई-रिक्षा, सायकल योजना, ई-कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, सौरऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, पदपथावर एलईडी दिवे, पीएमसी केयर, स्काडा, पाणी योजना, स्मार्ट हेल्थ, स्मार्ट पर्यटन, सीसीटीव्ही यंत्रणा आदी योजना राबविण्यात येणार आहेत. (अंदाजपत्रकात तरतूद : ५० कोटी रुपये)

दैनंदिन व्यवहारात माहिती तंत्रज्ञान
डिजिटायझेशन
पुणे महापालिकेच्या विविध खात्यांमधील डिजिटायझेशनचे प्रमाण वाढत असल्याने माहिती व तंत्रज्ञान विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. पुणे मनपाची सर्व विभागांची माहिती अद्ययावत ऑनलाइन डॅशबोर्डच्या माध्यमातून विकसित करून सेंट्रलाइज प्लॅटफॉर्म कार्यान्वित करण्यात येणार आहे. सर्व संगणक प्रणाली इंटिग्रेट करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या डॅशबोर्ड प्लॅटफॉमचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. नगरसचिव विभागाकडील सन १९५० पासूनचे सर्व जुने व महत्त्वाचे दस्त, नोंदी, अभिलेख, विविध समिती निर्णय इत्यादी कागदपत्रांचे स्कॅनिंग करून ती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात गरजेप्रमाणे त्याचा वापर करता येईल. यासाठी अंदाजपत्रकात पुरेशीतरतूद करण्यात आली आहे.

दैनंदिन व्यवहारातील संगणक साक्षरता
इंटरनेटमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती झाली आहे. रेत्त्वे बुकिंग, एसटी बुकिंग, लाइट बिल भरणे, टेलिफोन बिल भरणे, कर भरणे, सिनेमाची तिकिटे काढणे, इंटरनेट बँकिंग आदी दैनंदिन कामे ऑनलाइन पद्धतीने मोबाइल किंवा संगणकाच्या मदतीने केली जातात. त्यामुळे वेळेची मोठी बचत होते. ज्येष्ठ नागरिक व महिलांना संगणकाचे व मोबाइलचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम ‘डिजिटल लिटरसी’च्या माध्यमातून महिला व ज्येष्ठ नागरिकांना शिकविण्यात येणार आहे.

समाजकल्याणकारी योजना
महिलांसाठी वसतिगृह
शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परगावांहून पुण्यात येणार्‍या महिला आणि युवतींची सं‘या मोठी आहे. शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे नगर रस्ता परिसरातही परगावांहून येणार्‍या महिलांची संख्या वाढत आहे. माफक शुल्क आकारून महिलांना निवासासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कळस-धानोरी परिसरात महापालिकेच्या वतीने विद्यार्थिनी आणि नोकरी करणार्‍या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : २ कोटी रुपये)

लाइट हाउस प्रकल्प
लाइट हाउस प्रकल्पात १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील २० हून अधिक प्रशिक्षण अभ्यासक‘म चालविले जातात. प्रामु‘याने वस्तीमधील व आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश दिला जातो. टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्यूटी व हेल्थ, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग सहायक, कुकिंग असे अभ्यासक्रम शिकविले जातात. भवानी पेठ व वारजे या ठिकाणी दोन लाइट हाउस प्रकल्प सुरू आहेत. वडगाव शेरी व शहरात उपलब्ध होणार जागांवर नवीन लाईट हाउस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. (अंदाजपत्रकात तरतूद : ३ कोटी ४० लाख रुपये)

राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना
महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविण्याच्या उद्देशाने राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिला व युवतींसाठी स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि समुपदेशन या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. महिला व युवतींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना स्वसंरक्षण करता यावे यासाठी ज्यूदो, कराटे, लाठी-काठी, योगासने व व्यायाम शिकविले जाणार आहेत. महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून व्यवस्थापन, क्षमतांचे संवर्धन, उद्योजकीय विकास, रोजगाराच्या संधी व बाजारपेठ मिळवून देणे आदी कार्यक‘म राबविले जाणार आहेत. पौगांडावस्थेतील मुली, युवती, विवाहित महिला यांच्या विविध समस्या व प्रश्‍न, कौटुंबिक सल्ला, महिलांचे अधिकार, कायदे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)