जाणून घ्या… ‘विष्णू नारायण भातखंडे’ यांच्याबद्दल

दि. 10 ऑगस्ट 1860 या दिवशी मुंबईतील वाळकेश्वर येथे हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील एका थोर संगीतशास्त्रकारांचा जन्म झाला. त्यांचे नाव विष्णू नारायण भातखंडे! कोकणातील नागाव गावचे हे विष्णू नारायण ऊर्फ संगीतशास्त्र संशोधक, संगीत प्रसारक म्हणून ओळखले जातात.

बालपणापासून संगीताची उपजत जाण असणाऱ्या विष्णू नारायणांनी उपलब्ध रागदारी व चीजा हाच संशोधनाचा व उपपत्तीचा पाया मानून संगीत कलेच्या आपल्या अभ्यासाची सुरुवात केली. त्यासाठी अनेक बुजुर्ग कलावंतांची मते जाणून घेण्यासाठी भारतभर प्रवास केला. प्राचीन संगीत विद्येचे संशोधन, नव्या संगीत शास्त्रची उभारणी आणि त्याचा प्रचार व प्रसार यासाठी त्यांनी संगीत विद्यालयांची स्थापना केली.

-Ads-

बडोद्याची संगीतशाळा, ग्वाल्हेरचे माधव संगीत विद्यालय ही त्यांची कर्तृत्वस्थळे. लखनौ येथे मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक स्थापन केले. हेच आजचे भातखंडे संगीत महाविद्यालय! अशा या महान संगीतशास्त्राची, हिंदुस्थानातील थोर संगीत प्रसारकाची अखेर दि. 19 सप्टेंबर 1936 रोजी मुंबईत झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)