‘नॉक! नॉक! सेलिब्रिटीं’मध्ये सुमीत राघवन व क्षिती जोग!

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. सध्याच्या काळात हे कुतूहल शमवण्याचं काम वेगवेगळी समाजमाध्यमं आणि स्वतः सेलिब्रिटी सातत्यानं करत असतात. अशाच एका ‘सेलिब्रिटी’ हे बिरुद मिरवणाऱ्या एका अभिनेत्याच्या आयुष्याबद्दलचे दोन टोकाचे दृष्टिकोन उलगडणारं ओंकार अरविंद कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित ‘नॉक! नॉक! सेलिब्रिटी’ हे नवं नाटक. या अत्यंत वेगळ्या विषयावरील नाटकाची निर्मिती संतोष रत्नाकर गुजराथी, मनोज पाटील, विजय केंकरे यांच्या ‘विप्लवा’ ‘प्रवेश निर्मित’ केले असून या नाटकाचे सादरकर्ते संतोष रत्नाकर गुजराथी आहेत. लोकप्रिय अभिनेते सुमीत राघवन आणि क्षिती जोग यांच्या अप्रतिम अभिनयाने सजलेल्या या नाटकातील त्यांच्या या भूमिका विलक्षण नाट्यानुभव देणाऱया आहेत.

‘विप्लवा’ या संस्थेद्वारे मनोरंजन निर्मितीत पाऊल टाकलेल्या संतोष रत्नाकर गुजराथी यांनी दर्जेदार कलानिर्मिती निर्माण करण्याचे प्रमुख उद्दिष्ठ ठेऊन ‘ॲब्सोल्युट’ या त्यांच्या पहिल्या नाटकाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मालिका निर्मितीत प्रवेश करीत ‘रुद्रम’ आणि ‘कट्टी बट्टी’ या मालिकांची सहनिर्मिती केली आहे. तसेच व्यावसायिक रंगभूमीवर संजय नार्वेकर अभिनीत ‘घरात मॅरीड बाहेर बॅचलर’ या आगल्या वेगळ्या नाटकाची निर्मिती केली असून विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यनिर्मितीसाठी त्यांच्या सोबत दिग्दर्शक मंदार देशपांडे हे क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.

ओंकार कुळकर्णी आणि मंदार देशपांडे या नव्या दमाच्या लेखक दिग्दर्शक जोडगोळीचं ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर रुजू झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)