ठाण्यात भरदिवसा तरूणीवर जीवघेणाहल्ला

उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू
ठाणे – ठाण्यातील आरटीओ ऑफिसजवळ दिवसाढवळ्या एका तरूणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली असून हल्ला करून तरूण पसार झाला. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्राची विकास झाडे असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे. तर हल्लेखोराचे नाव आकाश पवार आहे. त्याने 22 वर्षांच्या या तरूणीवर हल्ला का केला ही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ही घटना दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्ररणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राची ही कोपरी कॉलनी येथील किशोर नगर परिसरात राहात होती. ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी प्राची नोकरीही करत होती. सकाळी ती बाईकवरून ऑफिसला जायला निघाली. पूर्वद्रुतगती मार्गावरून जात असतना आकाश पवार (वय 25 रा. भिवंडी) याने तिच्यावर चाकूने वार केले. काहींनी या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हातात चाकू असताना कोणीही पुढे सरसावले नाही.

प्राचीला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. आकाश आणि प्राची हे दोघे एकमेकांना तीन वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्यात प्रेमसंबंधही होते. मात्र काही कारणामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, अशीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आकाशने यापूर्वीही प्राचीला जून महिन्यात मारहाण केली होती. तसेच तिला धमक्‍याही दिल्या होत्या. याबद्दल प्राचीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे.प्राचीच्या कुटुंबीयांनी आकाशला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)