कोलकाता नाईट रायडर्सचे हैदराबादसमोर 160 धावाचं आव्हान

हैदराबाद – क्रिस लिन याच्या 54 आणि सुनील नारेनच्या तडाकेबाज 25 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादसमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले आहे. सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 159 धावसंख्येपर्यत मजल मारली.

कोलकाता नाईट रायडर्सकडून क्रिस लिनने 51(47), सुनील नारेन 25(8), शुबमन गिल 3(4), नितीश राणा 11(11), रिंकु सिंह 30(25) आणि आंद्रे रसेल 15(9) धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादकडून खलील अहमद 4 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारने 2 तर संदीप शर्मा आणि रशिद खान यांने 1 विकेट घेतली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)