श्रीनगर- जम्मू-काश्मिरमधील किश्तवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका ठिकाणाचा पर्दाफाश करण्यात जवानांना यश आले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
सुरक्षा विभागाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सेना व विशेष मोहिम पथकाने केश्वान भागातील पंथना येथे रविवारी घेराबंदी व शोधमोहिम राबली होती. या दरम्यान दहशतवाद्यांच्या एका ठिकाणाचा पर्दाफाश करण्यात आला.
या ठिकाणीहुन जवानांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठ्यासह स्लीपिंग बॅग, पलंग, स्टीलचे चार बॉक्स, एक गॅस सिलेंडर, फळांच्या रसाची कॅन, नुडल्स, एक हाताची घड्याळ, तीन मासिक व तीन ब्लॅकेंट आदी साहित्य जप्त केले. हे सर्व साहित्य दहशतावादी जमाल दीन याच्या घरापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर आढळले आहे.