किर्ती आझाद यांची “घर वापसी’

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – भाजपाचे माजी मंत्री आणि दरभंगाचे खासदार किर्ती आझाद यांनी आज (दि.18) पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षविरोधी कारवाया केल्याने आझाद यांची 2015 मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आझाद हे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. कॉंग्रेस प्रवेशानंतर त्यांना बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघात त्यांचा मुकाबला पारंपारिक लढत असणाऱ्या भाजपा आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत होणार आहे.

किर्ती आझाद हे बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पुत्र आहेत. यावेळी दरभंगातून आपल्याला उमेदवारी मिळण्याची शक्‍यताही त्यांनी बोलून दाखवली. आझाद यांनी 2014 मध्ये चार वेळा खासदार असलेले मोहम्मद अली अश्रफ फादमी यांचा 34,000 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी जदयूचे उमेदवार संजय कुमार झा हे तिसऱ्या स्थानावर होते. मात्र, यावेळी झा जदयूच्या तिकीटावरुन एनडीएचे उमेदवार म्हणून इथून उभे राहणार आहेत.

दरम्यान, बिहारमध्ये कॉंग्रेस आणि राजद यांनी युती केली आहे. मात्र, त्यांचे जागा वाटप अजून व्हायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)