भाजपाचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांनी सोमवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यलयात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचे काँग्रेस पक्षात स्वागत केले आहे.

क्रिकेटपटू ते राजकीय नेता झालेले किर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बिहारचे माजी मुख्यमंत्री भगवती झा आझाद यांचे किर्ती आझाद हे सुपुत्र आहेत. 1983 च्या विश्‍वविजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1993 मध्ये दिल्लीतील गोल मार्केटतील विधानसभा निवडणुकीपासून केली होती. त्यानंतर ते 1998 मध्ये बिहारकडे वळाले. तिथे त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला. मात्र, 1998 नंतर त्यांना विजयासाठी 2009 सालापर्यंत वाट पाहावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)