फिंच, युवराजला पंजाबच्या संघातून डच्चू

नवी दिल्ली  – गतवर्षीच्या आयपीएल स्पर्धेत दणक्‍यात केलेल्या सुरुवातीनंतर हंगामाच्या शेवटी शेवटी कामगिरी खालावलेल्या किंग्ज एलेव्हन पंजाबच्या संघाने आपल्य संघातून 11 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला असून त्यात युवराज सिंग, ऍरोन फिंच सारख्या दिग्ग्ज खेळाडूंचा समावेश आहे. तर, संघात राखलेल्या खेळाडूंमध्ये आर. अश्‍विन, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांचा समावेश असनार आहे.

आयपीलमध्ये गतवर्षीच्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने यंदाच्या हंगामात नवीन रणनितीच्या आधारे मैदानात उतरण्याचे ठरवले असून. आगामी हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने युवराज सिंह सोबत ऍरोन फिंच आणि अक्षर पटेलया दिग्गज आणि टी-20 स्पेशलिस्ट समजल्या जाणाऱ्या खेळाडूंना करारमुक्त केले आहे.

मागच्या हंगामात फलंदाजीत खराब कामगिरी केल्यामुळे यंदा पंजाबने युवराजला कायम राखण्यात स्वारस्य दाखवले नाही. याव्यतिरीक्त पंजाबने मागच्या वर्षीच्या संघातून लोकेश राहुल, ख्रिस गेल, रविचंद्रन आश्विन यांना संघात कायम राखले आहे. गत हंगामात राहुल आणि गेलयांनी संघाला चांगली सुरुवात करुन देताना अनेक सामन्यात विजय मिळवून दिला होता.

2019 आयपीएलसाठी पंजाबने कायम राखलेले खेळाडू – लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्रू टाय, मयांक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, रविचंद्रन आश्विन

2019 आयपीएलसाठी पंजाबने करारमुक्त केलेले खेळाडू – ऍरोन फिंच, अक्षर पटेल, मोहीत शर्मा, युवराज सिंह, बरिंदर सरन, बेन डॉर्शियस, मनोज तिवारी, अक्षदीप नाथ, प्रदीप साहू, मयांक डागर, मंझूर दार

अदला-बदल केलेले खेळाडू – मनदीप सिंहच्या बदल्यात मार्कस स्टॉयनिस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)