ट्रम्प यांच्याबरोबर चर्चेच्या दुसऱ्या फेरीस किम तयार

बिजींग: उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चेसाठीच्या दुसऱ्या शिखर परिषदेला तयारी दर्शवली आहे. चीनच्या दौऱ्यादरम्यान किम यांनी कोरियन द्विपकल्पातील आण्विक कोंडी सोडवण्यासाठी ट्रम्प यांच्याबरोबरच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीला आपली तयारी असल्याचे सांगितले आहे. चीन आणि उत्तर कोरियाच्या प्रसिद्धीमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपल्या सुसज्ज रेल्वेमधून पत्नी रि सोल जु यांच्यासह किम दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आले होते. किम आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र या चर्चेचा अन्य तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील चर्चेला शी जिनपिंग यांच्याकडून अनुकुलता दर्शवली गेली आहे. यापूर्वी किम आणि ट्रम्प यांच्यात सिंगापूर इथे जून महिन्यात पहिल्यांदा चर्चा झाली होती. मात्र परस्परांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे या बैठकीमधून कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकलेला नव्हता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या 10 महिन्यांमध्ये किम चारवेळा चीनच्या दौऱ्यावर आले होते. उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील तणाव कमी करण्यासाठी चीनकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे किम यांनी वारंवार चीनला भेट दिली आहे. किम आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेचे ठिकाण ठरवण्यासाठी उत्तर कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिएतनाममध्ये भेटीचा विचार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)