किकी चॅलेंज पडले महागात! कोर्टाने ठोठावली आगळी-वेगळी शिक्षा 

मुंबई: सध्या सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या लोकांवर किकी चॅलेंज नावाचं भूत चढलं आहे. तरुण-तरुणीतर सोडाच वयस्कर लोक देखील या जीवघेण्या चॅलेंजपायी आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. ड्रेक या कॅनडियन रॅप गायकाच्या ‘किकी डू यु लव्ह मी’ या गाण्यापासून हे चित्र-विचित्र चॅलेंज प्रेरित झाले असून चालत्या गाडीतून उतरून नृत्य करावे लागत असल्याने हे चॅलेंज जीवघेणं ठरू शकत.
दरम्यान हेच किकी चॅलेंज स्वीकारणं मुंबई येथील तीन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. श्याम शर्मा व त्याचे वर्गमित्र ध्रुव आणि निशांत हे वसई रेल्वेस्थानकावर चालत्या रेल्वेगाडीतून उतरून किकी चॅलेंज करतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ही माहिती रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या तिन्ही तरुणांना अटक करून रेल्वे न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने या तिन्ही तरुणांना सलग तीन दिवसांसाठी वसई रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म्स साफ करण्याची शिक्षा दिली असून तयाचबरोबर या तीन तरुणांना ‘किकी’ सारख्या जीवघेण्या स्टंट्स पासून दूर राहण्यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृती देखील करायची आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)