किदांबी श्रीकांत, पीव्ही सिंधू उपउपांत्यफेरीत दाखल

File photo....

नवी दिल्ली -भारताचा आघाडीचा पुरुष खेळाडू किदांबी श्रीकांत याने नवी दिल्ली येथील केडी जाधाव इनडोअर स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅंडमिंटन स्पर्धेत चीनच्या लू जिझीचा उपउपांत्यपूर्व फेरीत सरळ दोन सेटमध्ये 21- 11 आणि 21- 16 असा पराभव करत उपउपांत्यफेरी गाठली. महिला विभागात भारताची अव्वल खेळाडू पीव्ही सिंधूने हॉंगकॉंगच्या डेन एक्‍सचा 21-11 आणि 21-13 असा पराभव करत उपउपांत्यफेरीतील स्थान निश्‍चित केले. अन्य सामन्यात साई प्रणिथ, पी. कश्‍यप, एचएस प्रणॉय यांनीदेखील पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

श्रीकांतने पहिल्या मिनिटापासूनच सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्याने पहिलया सेटमध्ये आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. त्याचा त्याला फायदा झाला आणि त्याने पहिला सेट 21-11 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेट्‌मधेची त्याने चायनीज खेळाडूला पुनरागमनाची संधी दिली नाही. दुसरा सेटही सहज 21-13 असा जिंकत त्याने सामना आपल्या नावे केला.

दुसऱ्या सामन्यात साई प्रणिथने पहिला सेट गमाविल्यानंतर समीर वर्माचे कडवे आव्हान 18- 21, 21-16 आणि 21-15 असे परतावून लावले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळ करण्यावर भर दिला. परंतु मोक्‍याच्यावेळी समीर वर्माने आपला खेळ उंचावत पहिला सेट 21-18 असा जिंकला. त्यानंतर पुढील दोन सेटमध्ये दमदार पुनरागमन करत साई प्रणिथने दोन्ही सेट जिंकले आणि सामनाही जिंकला. उपांत्यफेरीतील स्थान पक्‍के करण्यासाठी किदांबी श्रीकांत आणि साई प्रणिथ यांच्यात सामना होणार आहे.

त्यानंतर झालेल्या सामन्यात पी. कश्‍यपने थायलंडच्या सेन्सॉम्बूनसुकचा सरळ दोन सेटमध्ये 21-11, 21-13 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. त्याचा पुढील सामना चीनच्या वांग टी. डब्लूशी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)