सुपे – महाराष्ट्र किक बॉक्‍सिंग चॅम्पीयनशिपमध्ये सुपे येथील “एमटीएस इंग्लिश मीडियम स्कूल’ला राज्यस्तरावर पाच सुवर्णपदके व तीन रौप्यपदके मिळाली आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यस्तरावरील किक बॉक्‍सिंग स्पर्धा नुकतीच पार पडली.

यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हास्तरावर विजयी झालेल्या संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सुपे येथील “एमटीएस इंग्लिश मीडियम स्कूल’ला राज्यस्तरावर पाच सुवर्णपदके मिळाली.

साईगणेश थोरात, श्रद्धा थोरात, ओंकारेश्वर मगर, संग्राम चारूडे, रामदास पठारे, अनुष्का कळमकर, अनुष्का शिंदे, श्रावणी शेलार, प्रज्योत काम यांना पदके मिळाली. या निवडीबद्दल विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब पठारे, उपाध्यक्ष अनिकेत पठारे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)