स्मृती मानधनाचे इंग्लंडमध्ये विक्रमी शतक

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट महिला संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने इंग्लंडमधील टी-२० लिगमध्ये दमदार फलंदाजी करत विक्रमी शतक केले आहे. स्मृतीने केवळ ६१ बॉलमध्ये १०२ धावा केल्या आहेत. यामुळे टी-२० मधील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम तिने केला आहे.

स्मृती मानधना इंग्लंडमध्ये किया वुमन क्रिकेट सुपर लीग स्पर्धेत वेस्टर्न स्टोर्म संघासाठी खेळत आहे. या सामन्यात लँकशायर थंडर या संघाने प्रथम फलंदाजी करत वेस्टर्न स्टोर्म संघाला १५३ धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्मृती मानधनाने वादळी शतकी खेळी केली. स्मृतीच्या या शतकाला १२ चौकारांचा आणि ४ षटकारांचा साज होता. स्मृतीच्या शतकी खेळाच्या जोरावर वेस्टर्न स्टोर्म संघाने ७ गडी गमावत लँकशायर थंडर संघावर विजय मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, स्मृती मानधना ही सर्वात जलद शतक करणारी मिताली राज नंतरची दुसरी महिला बनली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)