बालाकोट एयरस्ट्राईकमधील दहशतवाद्यांचे मृतदेह नेले खैबर पख्तूनवाला – एक कार्यकर्ता

वॉशिंग्टन : भारताने केलेल्या बालाकोट एयरस्ट्राईकमधील दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तूनवाला नेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. गिलगिटहून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका कार्यकर्त्याने ही माहिती दिली आहे.

भारताने केलेल्या एयरस्ट्राईकनंतर बालाकोटमध्ये दहशतवादी ट्रेनिंग कॅंप नसल्याचे आणि एकही दहशतवादी मारला गेला नसल्याची ग्वाही पाकिस्तान सतत देत आला आहे. मात्र गिलगिटहून अमेरिकेत आलेल्या सेंगे हरनान सेरिंग या कार्यकर्त्याने पाकिस्तानचे खोटेपण उघड केले आहे. त्याने बालाकोट एयरस्ट्राईकमध्ये मोठ्‌या संख्येने-सुमारे 200पेक्षा अधिक, दहशतवादी मारले गेल्याचे आणि दहशतवाद्यांचे मृतदेह खैबरपख्तुनवा येथे पाठवल्याचे उघड केले आहे. उर्दू मीडियातही ही गोष्ट उघडकीस आली आहे. जंगल भागात एयरस्ट्राईक झाल्याचे पाकिस्तान सांगते, तर मग त्याठिकाणी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला जाण्यापासून का रोखले जात आहे? असा साधा सरळ प्रश्‍न त्याने विचारला आहे.

भारतीय एयरस्ट्राईकमध्ये 200 पेक्षा पाकिस्तानी जण मारले गेल्याचे उर्दू मीडियाने छापले असल्याची माहिती सेंगे हरनान सेरिंग याने एका वृत्तवाहिनीबरोबर चर्चा करताना दिली. या संदर्भात 2.20 मिनिटांचा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात पाकिस्तानी सैनिक बालाकोटमधील लोकांना आपले 200 हून अधिक लोक शहीद झाल्याचे सांगत त्यांचे सांत्वन करताना दिसत आहेत. या काळात आपण सरकारच्या पाठीशी राहिले पाहिजे असेही ते सांगताना व्हिडियोत ऐकू येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)