शहीद जवानांवर आयुष्यमान खुरानाची भावूक कविता

जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 42 जवान शहीद झाले अहोत. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर अनेकांनी या घटनेनंतर निषेध व्यक्त केला. अजूनही विविध क्षेत्रातून अनेक स्वरूपात प्रतिक्रिया येत आहेत. बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने शहिद जवानांवर एक भावूक कविता लिहिली आहे. त्याने ही कविता ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे.

देश का हर जवान बहुत खास है,
है लड़ता जब तक श्वास है,
परिवारों के सुखों का कारावास है,
शहीदों की माओं का अनंत उपवास है,
उनके बच्चों को कहते सुना है
पापा अभी भी हमारे पास हैं!
-आयुष्मान

दरम्यान, यापूर्वी अनेक बॉलीवूड अभिनेत्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक इंग्रजी कविता सादर केली होती. तर मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने सुध्दा कविता शेअर केली होती. पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक फोटो आणि संदेश पाठविले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)