रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींना दुहेरी मुकुट

पुणे : चार बाय 100 मीटर्स रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या 17 आणि 21 वर्षाखालील मुलींनी सुवर्णपदकाची कमाई केली. 17 वर्षाखालील महाराष्ट्राच्या सुदेश्‍ना शिवणकर, हरिता भद्रा, आदिती परब, अवंतिका नरळे या मुलींनी हे अंतर 48.31 सेकंदात पार केले. त्यांच्या पाठोपाठ केरळ (48.61 से.) आणि तामिळनाडू (51.36 से.) यांनी अनुक्रमे रौप्य व कास्यंपदक पटकाविले.

तसेच 21 वर्षाखालील महाराष्ट्राच्या रोझलीन लेव्हीस, सिद्धी हिरे, रश्‍मी शेरीगर, किर्ती भोईटे या मुलींच्या संघाने 47.22 सेकंदात अंतर पार करीत सुवर्णपदकावर आपले नाव निश्‍चित केले. शेवटच्या काही सेकंदात महाराष्ट्राच्या रश्‍मी शेरीगर हिने आपला वेग वाढवत केरळच्या खेळाडूंच्या पुढे जात संघाला विजय मिळवून दिला. केरळ ( 47.29 से.) संघाने रौप्य आणि तामिळनाडू (47.87 से.) संघाने कास्यंपदक पटकाविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुलांमध्ये 17 वर्षाखालील गटात केरळने (43.21 से.) सुवर्ण, तामिळनाडू (44.37 से.) संघाने रौप्य पदक मिळविले. महाराष्ट्राच्या खेळाडूंना (44.80 से.) कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. तर, 21 वर्षाखालील महाराष्ट्राच्या मुलांना देखील केरळ (41.77 से.), तामिळनाडू (42.01 से.) यांनी मागे टाकले. महाराष्ट्राच्य संघाने 42.79 से. अंतर पार करीत कास्यंपदक मिळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)