खेलो इंडिया : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

हरयाणा द्वितीय तर दिल्ली तृतीय स्थानी; म्हाळुंगे बालेवाडी क्रीडानगरीत समारोप सोहळा संपन्न

पुणे – केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यामध्ये म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स 2019 चे सर्वसाधरण विजेतेपद यजमान महाराष्ट्राच्या संघाने पटकाविले. तसेच मागील वर्षी विजेते असलेल्या हरयाणाला यंदा द्वितीय आणि दिल्लीच्या संघाला तृतीय क्रमांकाचा करंडक प्रदान करण्यात आला.

शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन सभागृहात झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय क्रीडासचिव राहुल भटनागर, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालिका नीलम कपूर, राज्याच्या शिक्षण व क्रीडाखात्याच्या सहसचिव वंदना कृष्णा, दीपक भायसेकर, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सहसचिव ओंकार सिंग, चैतन्य दिवाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख विजय संतान यांसह खेळाडूंनी विजेतेपदाचा करंडक स्विकारला.

यावेळी उपस्थित खेलो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप प्रधान, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, युथ गेम्सच्या आयोजन समितीचे चेअरमन राजेंद्र पवार, क्रीडामंत्र्यांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद ढेकणे, क्रीडा विभागाचे उपसंचालक सुधीर मोरे यांनी आयोजनात महत्वाचा वाटा उचलला.

प्रकाश जावडेकर म्हणाले, खेलो इंडियाच्या विविध स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतला ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत आणि जे स्पर्धा पाहण्यासाठी आले त्यांचेही विशेष अभिनंदन. खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया, जे खेळाडू खेळतात आणि जे खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला येतात हाच नवा भारत आहे. शाळांमध्ये पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम खूप आहे. परंतु खेळ नाहीत, म्हणून आम्ही निर्णय घेतलाय आगामी काळात प्रत्येक शाळेत खेळाचा 1 तास नक्की असेल. खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया, असेही त्यांनी सांगितले.

विनोद तावडे म्हणाले, खेलेगा महाराष्ट्र तो खेलेगा राष्ट्र. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांचे मी आभार मानतो, त्यांनी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे आयोजन करण्याची संधी दिली. देशभरातून येथे खेळाडू आले आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी शाळेच्या 55 हजार विद्यार्थांनी हजेरी लावली.

अतिशय सुंदर नियोजन महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याने केले. चांगल्या खेळाडूंची कामगिरी अजून कशी चांगली होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आज महाराष्ट्राला सर्वाधिक पदके आहेत याचा आम्हाला आनंद आहे. परंतु आम्हाला खेळामध्ये देश पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे.

नीलम कपूर म्हणाल्या, खेलो इंडिया हा देशातील क्रीडाक्षेत्रातील महाउत्सव आहे. यामध्ये 10 हजार लोकांचा सहभाग होता. ज्यामध्ये 6 हजार खेळाडू, 1 हजार सहाय्यक वर्ग, 900 तांत्रिक अधिकारी, 1 हजार स्वयंसेवक आणि 1500 अधिकारी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)