कुस्तीमध्ये महाराष्ट्राला तीन रौप्य

पुणे : कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या गोकुळ यादव व रोहित अहिरे यांनी मुलांच्या विभागात तर भाग्यश्री फंड हिने मुलींमध्ये रुपेरी कामगिरी केली. मुलींच्या 17 वषार्खालील गटात भाग्यश्री फंड हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम फेरीत हरयाणाच्या नोजू हिने सहज हरविले. संजना बागडी व सुप्रियाकुमारी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 65 किलो गटात ब्रॉंझपदक पटकाविले.

61 किलो गटात महाराष्ट्राच्या सृष्टी भोसले हिने ब्रॉंझपदक मिळविले. 53 किलो गटात दिशा करांडे हिने ब्रॉंझपदकाची कमाई केली. 49 किलो गटात स्मिता पाटील हिने ब्रॉंझपदक मिळविले. मुलांच्या 21 वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या गोकुळ यादव याला रौप्यपदक मिळाले. 77 किलो गटातील अव्वल साखळी लढतीत त्याने हरयाणाच्या अंकितकुमार याला हरविले मात्र त्याला अन्य लढतीत अमितकुमार या हरयाणाच्या मल्लाने त्याला पराभूत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या गटातच तीनच मल्ल सहभागी झाले होते. 72 किलो गटात महाराष्ट्राच्या रोहित अहिरे याला रौप्यपदक मिळाले. त्याला राजस्थानच्या छगनकुमार याने एकतर्फी लढतीत पराभूत केले. 97 किलो विभागात महाराष्ट्राच्या दिग्विजय भोंडवे याने ब्रॉंझपदकाची कमाई केली.

ज्युदो स्पर्धेत प्रथम गुरवला ब्रॉंझपदक

महाराष्ट्राच्या प्रथम गुरव याने ब्रॉंझपदक मिळविले. त्याने 17 वषार्खालील मुलांच्या 55 किलो गटात हे पदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीच्या ज्युदोकांनी सहापैकी तीन गटांमध्ये सुवर्णपदके जिंकून वर्चस्व गाजविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)