मानवादित्यसिंह राठोडला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक

पुणे – मानवादित्यसिंह राठोड याने 21 वषार्खालील ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळविले आहे. स्पर्धेबाबत मानवादित्य म्हणाला, येथे विजेतेपदाची मला खात्री होती. ही स्पर्धा 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पधेर्साठी निवड चाचणी मानली जाते. त्यामुळेच या महोत्सवात सर्वच खेळांमध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाले आहेत. साहजिकच या स्पर्धेस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑलिंपिक पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी यंदा विविध जागतिक मालिकांमध्ये चांगले यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे.

मानवादित्य हा नवी दिल्ली येथील हंसराज महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. येथे तो राजस्थानकडून सहभागी झाला आहे. नेमबाजी हा खेळ का निवडला असे विचारले असता तो म्हणाला, खरंतर मी शाळेत असताना फुटबॉल, बास्केटबॉल, जलतरण आदी खेळांमध्ये भाग घेत असे. तथापि फुटबॉल खेळत असताना खूप वेळा दुखापती झाल्या. त्यामुळे बाबांनी मला नेमबाजीचा सराव करण्याचा सल्ला दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणे हे प्रत्येक नेमबाजाचे लक्ष्य आहे. माझ्या बाबांनी ऑलिंपिक रौप्यपदक मिळविल्यानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माज्यावर आहे. हे लक्ष्य साध्य करणे सोपे नसले तरी ते साध्य करण्यासाठी मी भरपूर कष्ट करणार आहे असे मानवादित्य याने सांगितले. नेमबाजीत महाराष्ट्राच्या खेळाडूंना शनिवारी एकही पदक मिळविता आले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)