जिम्नॅस्टिक्‍समध्ये महाराष्ट्राच्या एरिक डे याला सुवर्णपदक

पुणे – जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या एरिक डे याने 21 वर्षाखालील गटातील साधन प्रकारांमध्ये वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याने पॉमेल हॉर्स, समांतर बार, रोमन रिंग्ज आदी सर्वच प्रकारांमध्ये सर्वोत्तम कौशल्य दाखविले.

त्याने 73.55 गुणांची कमाई केली. उत्तरप्रदेशच्या अग्निवेश पांडे याच्यावर त्याने निसटता विजय मिळविला. पांडे याने 71.35 गुणांसह रौप्यपदक मिळविले.

ओंकार शिंदे या महाराष्ट्राच्याच खेळाडूने ब्रॉंझपदक घेताना घरच्या प्रेक्षकांना आणखी एका पदकाचा आनंद मिळवून दिला. त्याने 69.45 गुण नोंदविले. महाराष्ट्राच्या अनास नासिर व उत्कर्ष मोरणकर यांना अनुक्रमे सहावे व सातवे स्थान मिळाले. या स्पर्धेत 42 खेळाडूंनी भाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)