खेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध

ईशा पवार

पुणे : एकाग्रता व जिद्द यांचा सुरेख समन्वय राखून साक्षी शितोळे व ईशा पवार या महाराष्ट्राच्या खेळांडूंनी तिरंदाजीमध्ये सुवर्णवेध घेत आपल्या राज्यास खेलो इंडिया महोत्सवात यशस्वी सांगता करुन दिली.

प्रथमेश जावकर याचे सुवर्णपदक केवळ एका गुणाने हुकले. आर्मी स्पोटर्स इन्स्टिट्युट येथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत साक्षी हिने 21 वर्षाखालील मुलींच्या विभागात रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तिने अंतिम फेरीत पश्‍चिम बंगालच्या सुपर्णा सिंग हिला 6-0 अशा फरकाने हरविले.

शेतकऱ्याची पोर लई हुशार

साक्षी ही पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत असून ती रणजीत चामले यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचा सराव करते. साक्षी ही मूळची दौंड तालुक्‍यातील पाडवी या खेडेगावची असून तिचे वडील शेतकरी आहेत. तिने आतापर्यंत चार वेळा आशिया चषक स्पर्धेत भाग घेत दोन रौप्यपदकांची कमाई केली आहे. साक्षी हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर सांगितले, येथे सुवर्णपदक मिळविण्याची मला खात्री होती. खेलो इंडिया महोत्सव हा ऑलिंपिकसाठी महत्त्वाचा असल्यामुळे येथील विजेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

मुलींच्या 17 वर्षाखालील गटात ईशा पवार हिने कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक राखले. तिने 150 गुणांपैकी 145 गुणांची कमाई करीत उल्लेखनीय कामगिरी केली. या प्रकारात राज्य विक्रम नोंदविणाजया ईशा हिने गतवेळीही खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

अखिल भारतीय स्तरावर तिला अग्रमानांकनही असून ती गेली चार वर्षे ओंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. डेरवण येथील एस.व्ही.जे शिक्षण संस्थेत ती शिकत असून गतवर्षी तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंधरा वषार्ची खेळाडू ईशा म्हणाली, या सुवर्णपदकाचे श्रेय माझ्या पालकांना व प्रशिक्षक घाडगे यांना द्यावे लागेल. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी या खेळात आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकले आहे. आगामी युवा जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत सर्वोच्च यश संपादन करण्याचे माझे ध्येय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)