खेड तालुक्‍याचा राज्यात “ई-ग्राम’ प्रथम क्रमांक

ग्रामपंचायती “पेपरलेस’ : कामकाजही अधिक जलद

पुणे – ग्रामपंचायतींचे काम ‘स्मार्ट’ आणि ‘पेपरलेस’ होण्याच्या दृष्टीने तसेच सर्व कामकाजात एकसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामविकास विभागाने आपले सरकार सेवा केंद्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरूवात केली आहे. यासाठी “ई-ग्राम’ संगणक प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे खेड तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायती “पेपरलेस’ झाल्या आहेत.

प्रशासकीय कारभार अधिक वेगवान करण्यासाठी तसेच राज्यातील सर्व ग्रामपंचायती संगणीकृत करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. याद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायती “पेपरलेस’ करण्याची ही योजना आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली. खेड तालुक्‍यात हा प्रकल्प अधिक गतीने राबविण्यात आला. तालुक्‍यातील 162 ग्रामपंचायतींचे सर्व कागदपत्रे तसेच 1 ते 33 नमुन्यातील माहिती सुचीबद्ध पद्धतीने साठविण्यात आली आहे. यामुळे ग्रामपंचायतीची कार्यालये “हायटेक’ झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)