खेड- भिगवन उड्डाणपुलाचे काम रखडले

रेल्वे गेट तासात तीन-चार वेळा बंद

कर्जत – कर्जत तालुक्‍यातील खेड ते भिगवन या राज्यमार्गावर उड्डाणपुलाचे काम रखडल्याने प्रवाशांना चांगलाच खोळंबा होत आहे. पुणे-सोलापूरसह देशाच्या विविध भागाला जोडणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या येथुन जातात. रेल्वे क्रॉसिंगसाठी या मार्गावर बसविलेले गेट वारंवार बंद केले जाते. तासाभरात तीन-चार वेळा गेट बंद होत असल्याने प्रवाशांना रस्त्यातच अडकून पडावे लागत असल्याने त्यांचा खोळंबा होत आहे.

राशीन-बारामती राज्यमार्गावर सुमारे दोन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे काम मंजुर झाले. त्यानुसार हे काम सुरुही करण्यात आले. मात्र काम सुरू झाल्यानंतर मार्गाच्या बाजूला जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी खासगी जागेत पुलाचे काम होत असल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे हे काम बंद करण्यात आले. कित्येक महिन्यांपासुन हे काम बंद पडलेले आहे. अर्धवट अवस्थेत काम बंद झाल्याने या कामाचे साहित्य रस्त्याच्या बाजूला पडलेले आहे. या मार्गावरील वाहतूकीलाही अडचणी येत आहेत.

भिगवण येथून खेडला दररोज नोकरीसाठी जावे लागते. मात्र रस्त्यातच रेल्वे गेट वारंवार पडत असल्याने प्रवासात अडथळा येतो. रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन काम त्वरित पूर्ण करावे.
-मारुती सायकर, माजी पंचायत समिती सदस्य

नगर आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाच्या कामाला कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र कित्येक महिन्यांपासून हे काम रखडल्याने प्रवासी मात्र हैराण झाले आहेत. खेड -राशीन भागातून दररोज कामानिमित्त भिगवणला जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांनाही या समस्येला सामोरे जावे लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)