खाशोगी हत्या प्रकरण : अमेरिकेने सौदीच्या अधिकाऱ्यांचे व्हीसा केले रद्द 

वॉशिंग्टन – पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणात अमेरिकेने आपला जुना मित्र असलेल्या सौदी अरेबियावरील कारवाईला सुरूवात केली असून पहिल्या टप्प्यात त्यांनी या हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या संशयीत सौदी अधिकाऱ्यांचे व्हीसा रद्द केले आहेत.

अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी सांगितले की या हत्या प्रकरणात हात असलेल्या काहीं सौदी अधिकाऱ्यांना आम्ही शोधून काढले असून त्यांचे व्हीसा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या अनुषंगाने आता यापुढील कारवाई टप्प्याटप्प्याने केली जाईल असेही त्यांनी नमूद केले. खाशोगींचा आवाज ज्या पद्धतीने दाबून टाकण्यात आला आहे तो अत्यंत गंभीर प्रकार असून अमेरिका अशा प्रकरणात गप्प बसणार नाही असेही पॉम्पेओ यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान अमेरिकेने नेमक्‍या किती सौदी अधिकाऱ्यांचे व्हीसा रद्द केले आहेत याची माहिती मात्र जाहीर केलेली नाही. खाशोगी हत्या प्रकरणाशी संबंधीत असलेल्यांवर आर्थिक निर्बंध लागू करण्याचाही विचार अमेरिकेने सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)