ब्रिटनमध्ये खलिस्तानी टेरर नेटवर्क उघड-भारत दुष्मन, पाक मित्र 

आम आदमी पक्षाला दिला होता निधी 
नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये खलिस्तानी टेरर नेटवर्क उघड झाले आहे. एका टीव्ही चॅनलने स्टिंग ऑपरेशन करून सनसनाटी खुलासा केला आहे की, खलिस्तानी टेरर नेटवर्कने भारताविरुद्ध लढा उभारला आहे. भारत हा आमचा सर्वात मोठा शत्रू असून पाकिस्तान हा खरा मित्र आहे, असे नॅशनल यूथ फेडरेशनचा प्रमुख शमशेर सिंह याने या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटले आहे, भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सेना प्रमुखांची हत्या आम्हीच केली, कारण ते आमचे कट्टर दुष्मन होते, भारताचे तुकडे करणे हा आमच्या खलिस्तान टेरर नेटवर्कचा उद्देश असल्याचेही त्याने म्हटले आहे.
जे लोक दिल्लीत बसले आहेत, ते आमचे दुष्मन आहेत. त्यांना आम्ही मारू इच्छितो. जर मोदी पुन्हा जिंकले, तर ते आमच्यासाठी मोठे धोकादायक असेल. असे स्पष्ट करून शमशेर सिंह याने भारताविरुद्ध गरळ ओकताना पुढे म्हटले आहे की, आरएसएसच्या नेत्यांना केसीएफने मारले आहे. भारताच्या विरोधात असलेल्या कोणाच्या सोबत जाण्यास आणि त्यांना मदत करण्यास आम्ही सज्ज आहोत. भारताविरुद्ध कारवाया करणारे काश्‍मीरातील फुटीरवादी, माओवादी आणि नक्षली यांच्या आम्ही संपर्कात आहोत.
शमशेर सिंह याच्या या वक्तव्यानंतर पंजाबच्या राजकारणाला एक वेगळेच वळण लागले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यांनी या प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे. आप’ला मिळालेला निधी कोठून आला याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे, तर निवडणुकी दरम्यान आपला मिळालेल्या सर्व निधीची चौकशी करावी असे दिल्ली अकाली दलाचे प्रमुख मनजीत सिह यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही आप ला निधी पुरवला होता अशी शमशेर सिंह याने कबुली दिली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)