बांगलादेशच्या माजी पंतप्रधान ‘खालिदा जिया’ यांना 7 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा

ढाका – बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांना एका स्थानिक न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवले आहे. खालिदा जिया याने न्यायालयाने सात वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा आणि 10 लाखाचा दंड सुनावला आहे. तसेच दंड नाही भरल्यास अतिरिक्त सहा महिने तुरूंगवास भोगावा लागणार आहे.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार बांगलादेशातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अख्तरूजजामन यांनी सोमवारी खालिदा जिया यांना ही शिक्षा सुनावली आहे. माजी पंतप्रधान या भ्रष्टाचाराच्या आणखी एका प्रकरणी अोल्ड सेंट्रल जेल (कारागृह) मध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत हा निकाल सुनविण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायालयाने या प्रकरणी अन्य तीन जणांना सुध्दा ही शिक्षा सुनावली आहे. खालिदा जिया यांना बहुचर्चित जिया चॅरिटेबल ट्रस्ट घोळाळ्याप्रकरणी ही शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)