“वरसगाव’ काठोकाठ

file photo

धरणसाखळी 91 टक्‍क्‍यांवर

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

-Ads-

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा रविवारी 91 टक्‍क्‍यांवर पोहोचला. दरम्यान, पानशेत आणि खडकवासला धरणे 100 टक्के भरली आहेत. सर्वाधिक साठवण क्षमता असलेले वरसगाव धरणही 91 टक्के ( 26.49 टीएमसी) भरले आहे.

धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून रविवारी सकाळपासून मुठा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी सकाळी 9 वाजता 5 हजार 136 क्‍युसेक असलेला हा विसर्ग वाढवून दुपारी 1 वाजता 6 हजार 48 क्‍युसेक करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.

गेल्या काही दिवसांपासून खडकवासला, पानशेत, वरसगाव, आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाले आहे. यामुळे धरणे भरली आहेत.

पावसाचा जोर कायम
दरम्यान, या चारही धरणांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 101 मिमी, पानशेत 46 मिमी, वरसगाव 41 मिमी, तर खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात 7 मिमी पाऊस झाला. तर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत खडकवासला 1 मिमी, पानशेत 14 मिमी, वरसगाव 11 मिमी, तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 मिमी पाऊस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)