ठळक बाबी : 2019 लोकसभा निवडणुक

एका मासिकाच्या मते 2004 साली लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचारासाठी तब्बल 115 अब्ज रुपये खर्च केले. त्या वेळी निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणूक क्षेत्रात जास्तीस जास्त 25 लाख रूपये खर्च करण्याची मुभा दिली होती. याचा अर्थ असा झाला की वास्तविक निवडणुकांचा खर्च हा कमाल मर्यादेपेक्षा दहा पटीने अधिक झाला होता. ही गोष्ट जाणून नक्कीच हैराण व्हाल की प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या एक लाख 50 हजार गाड्यांवर साडेसहा अब्ज रुपये खर्च झाले तर 100 कोटी रुपये हेलिकॉप्टर आणि विमाने यांच्यावर खर्च झाले.

अटलबिहारींची स्वच्छ प्रतिमा साथ देऊ शकली नाही, ना इंडिया शायनिंगच्या अपील ने मतदारांवर काही परिणाम केला नाही. या सर्व काळात महत्त्वाची गोष्ट घडली ती कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. काहींनी सोनिया गांधींच्या निर्णयाला खूप मोठे बलिदान म्हटले तर काहींनी त्याला काळाची गरज तर काहींनी त्याला सोनिया गांधी यांची मजबुरी असेही म्हटले. सोनिया गांधींनी माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना देशाची जबाबदारी उचलण्याची विनंती केली. 1990 च्या दशकात भारतात जागतिकीकरणाचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)