केसरी सिनेमाची दमदार कमाई; पहिल्या आठवड्यातच केलं ‘हे’ रिकाॅर्ड

नवी दिल्ली – बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित सिनेमा केसरी धूलिवंदनच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईच्या नवीन रिकाॅर्ड प्रस्थापित करत आहे. बुधवारी या सिनेमाने एक नवीन रिकाॅर्ड आपल्या नावे केले आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा या आठवड्यात सर्वात जलद 100 कोटी रूपायची कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

केसरी आणि गली बाॅय हे सिनेमे गुरूवारी प्रदर्शित झाले होते, त्यामुळे त्यांना आठवड्यात एक दिवस जास्त मिळाला होता. पहिल्या आठवड्यातील कमाईनंतरच केसरी हा सिनेमा टोटल धमाल सारखी कमाई करेल आणि सिनेमाच्या कमाईचे आकडे आणखी वेगाने वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

2019 मध्ये पहिल्या आठवड्यात शानदार कमाई करणाऱ्याच्या यादीत केसरी हा सिनेमा टाॅपवर आहे. केसरीने पहिल्या आठवड्यात 100 कोटी, गली बाॅयने 93.5 कोटी, टोटल धमाल 92.24 कोटी रूपये, उरी-द सर्जिकल स्टाइक 71.23 कोटी रूपये, मणिकर्णिका 56.56 कोटी, लुका छिपी 53.10 कोटी, बदला 37.78 कोटी, दी एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर 18.18 कोटी रूपये कमावले होते. हे सर्व बाॅक्स आॅफिसमधील पहिल्या आठवड्यातील कमाईचे आकडे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)