केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे  20 जणांचा मृत्यू

केरळ – केरळ राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पाऊस आणि भूस्खलन या घटनामुळे 20 जणांचा मृ्त्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार इडुक्की मध्ये भूस्खलनामुळे 10 लोकांचा, मलप्पुरममध्ये 5 लोकांचा, कन्नूरमध्ये 2 तर वायनाड जिल्हयात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता अाहेत.

इडुक्कीच्या अडीमाली शहरात एकाच घरातील पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. इदामालयर या धरणातून सकाळी 600 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. पावसामुळे इडुक्की, कोल्लम आणि इतर जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

-Ads-

पेरियार नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने विमानतळाच्या परिसरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानांचे लॅन्डिंग थांबविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)