केरळमध्ये पावसाचे थैमान, ३७ जण मृत्युमुखी 

कोची: केरळमध्ये जोरदार पावसामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून तब्ब्ल ३१,००० जणांना अतिवृष्टीपासून वाचवण्यासाठी मदत शिबिरांमध्ये दाखल करण्यात आले आहे. केरळ मधील एकूण १४ जिल्ह्यांपैकी निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे.
अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २५४७ एकरांवरील पिके पावसामध्ये वाहून गेली असून नागरिकांना देखील नाईलाजाने आपली घरे सोडून मदत शिबिरांचा आसरा घ्यावा लागत आहे.
केरळ आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख पी एच कुरियन यांनी राज्यातील सद्य परिस्थितीबाबत माहिती देताना “आज धरण परिसरांमध्ये पाऊस न झाल्याने दिलासा मिळाला असला तरी आम्ही मागे दिलेला १५ ऑगस्टपर्यंतचा धोक्याचा इशारा कायम ठेवत असून नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याचा सामना करू” असे सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)