श्रीसंथ वरिल अजिवन बंदी उठवली

सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला पुर्नविचार करण्याचे आवाहन

नवी दिल्ली – आयपीएल स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणी आजीवन बंदीच्या शिक्षेचा सामना करावा लागणाऱ्या श्रीसंथला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. बीसीसीआयकडून श्रीसंथवर लावण्यात आलेली बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली असून श्रीसंथला यापुढेही क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला श्रीसंतवर बंदी घातलेल्या निर्णयाचा तीन महिन्यात पुर्नविचार करण्याचा आदेश दिला आहे. श्रीसंथवरील बंदी उठविली असली तरीही त्याला लगेच क्रिकेट खेळता येणार नाही. बीसीसीआयने श्रीसंथचीही बाजू ऐकून घ्यावी, असे सांगत आजीवन बंदीची शिक्षा जास्त असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

2013 मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात श्रीसंथचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यावर श्रीसंथला क्‍लीन चिट मिळाली होती. परंतु, बीसीसीआयने त्याच्यावर या प्रकरणी आजीवन बंदी घातली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने त्याच्यावरील बंदी हटविली होती.

मात्र, बीसीसीआयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने आपला पहिला निकाल बदलून पुन्हा त्याच्यावर बंदी घातली होती. केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला श्रीसंथने सार्वोच्य न्यायालयात आव्हान दिले होते. यावेळी त्याने तो बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होता हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता, असेही श्रीसंतने न्यायाधीश अशोक भूषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले होते.

तसेच यावेळी माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचे उदाहरणही श्रीसंतने दिले होते. मॅच फिक्‍सिंगमध्ये दोषी आढळलेल्या मोहम्मद अझरुद्दीनला क्रिकेट प्रशासनावर पुन्हा येण्याची तसेच हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची बीसीसीआय कडून परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती त्याचे वकील सलमान खुर्शिद यांनी खंडपीठाला दिली होती. त्यामुळे जर अझरुद्दीनला पुन्हा संधी मिळू शकते तर श्रीसंतला का नाही? असा सवाल श्रीसंतच्या वकिलांनी उपस्थित केला होता. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आजीवन बंदीची शिक्षा जास्त असल्याचे सांगताना बीसीसीआयने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)