केरळमध्ये पावसाचा हाहाकार : २६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – केरळमध्ये अतिवृष्टी सुरु असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी भूत्स्खलन होऊन जवळपास २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या ६ तुकड्या तर सैन्याच्याही एका तुकडीकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर कमरेएवढे पाणी साठले असून अनेक ठिकाणचे रस्तेच वाहून गेले आहेत. यामुळे शाळा- महाविद्यालयांनाही सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत. रेल्वे ट्रॅकलाही मोठे नुकसान झाले असून विमानसेवाही खंडित झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिवृष्टीमुळे केरळमधील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून तब्बल २४ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठे धरण इडुक्की हेही भरले असून २६ वर्षानंतर यामधून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. जवळपास १० हजारांहून अधिक नागरिकांना मदत शिबिरामध्ये पाठविण्यात आले आहे. तर एनडीआरएफच्या तुकड्याकडून या भागांमध्ये बचाव कार्य सुरु आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याशी संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच संभाव्य मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)