केरळ मदतनिधीवरून लिपिकाने सरकारला फटकारले

नगर – केरळमध्ये उद्धभवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी देशभरातून ओघ सुरू आहे. राज्य सरकारने राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यासाठी एक दिवसाचा पगार देण्याचे निश्‍चित केले आहे. तसा आदेशच काढला आहे. या आदेशाला नगरमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिकाने हरकत घेतली आहे. केंद्र व राज्य सरकारला जबाबदारीची जाणिव करून देत त्याने चांगलेच फटकारले आहे.

केरळमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्याचा आदेश काढला आहे. मुख्यमंत्री यांनी हा आदेश 28 ऑगस्टला काढला आहे. नगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी या आदेशानुसार कार्यवाही सुरू केली. परंतु या कार्यवाहीला कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाने हरकत घेतली आहे. वरिष्ठांकडे ही लेखी हरकत नोंदवित लिपिकाने राज्य व केंद्र सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणिव देखील करून दिली आहे. सध्या ही हरकत नगरसह राज्यातील महसूल अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

या कनिष्ठ लिपिकाने हरकतीमध्ये म्हटले आहे, केरळ हे राज्य पर्यटनस्थळामुळे समृद्ध आहे. प्रत्येक घरातील एक व्यक्ती परदेशात नोकरीला आहे. पूरस्थितीत इतर राज्यांबरोबर महाराष्ट्र राज्यानेही 20 कोटी रुपयांची आर्थिक मदत केरळला केली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. मुंबईमधील महसूल थेट केंद्राकडे जातो. त्यामुळे केरळ राज्याची आपत्तीमध्ये आर्थिक घडी बसविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. या गोष्टीकडे लक्ष वेधण्याबरोबर राज्याच्या सद्यः परिस्थितीकडेही या लिपिकाने लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र राज्यात हजारो शेतकरी आत्महत्या करीत असताना शासना त्यांना कोणतीही शासकीय मदत न करणे, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वेळेवर न देणे, बुडविणे, सातवा वेतन आयोग लागू न करणे, नोकरभरती न करणे, जुनी पेन्शन योजना लागू न करणे आदी शासकीय कर्मचाऱ्यांप्रती शासनाच्या असलेल्या उदासीनकतेकडे देखील या कनिष्ठ लिपिकाने लक्ष वेधले आहे. या कनिष्ठ लिपिकाने विनंती करत सप्टेंबरच्या मासिक वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करू नये असेही म्हटले आहे.

जीएसटी करप्रणाली चुकीची

या कनिष्ठ लिपिकाने जीएसटी करप्रणाली चुकीची असल्याकडे देखील लक्ष वेधले आहे. इंधनाचे वाढते दर आणि त्याच्यावर उपाययोजना होत नसल्याचा देखील निषेध त्याने या हरकतीत नोंदविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)