केरळचा चित्ररथ वादाच्या भोवऱ्यात

सग्रंहित छायाचित्र...

नवी दिल्ली – शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा केरळच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला असतानाच आणखी एक निर्णय केंद्र तसेच राज्य सरकारदरम्यान वाद निर्माण करू शकतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात केरळ सरकारचा पुनर्जागरण थीमवरील प्रस्तावित चित्ररथ सामील होणार नसल्याचे समजते.

केरळ सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वायकोम सत्याग्रह आणि मंदिर प्रवेशाची घोषणा या मुद्यांवरील चित्ररथाचा प्रस्ताव मांडला होता. परंतु याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाची औपचारिकता प्रतिक्रिया मिळालेली नाही. चित्ररथांची निवड प्रक्रिया अद्याप सुरु आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन संचलनात 19 ते 21 चित्ररथ सामील असतात. परंतु यंदाच्या अंतिम यादीत 20 चित्ररथांना स्थान मिळाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्ररथांची निवड समिती संरक्षण मंत्रालयाच्या अधीन येते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा तापला आहे. या मुद्यावर केरळ सरकार आणि भाजप समोरासमोर ठाकले आहेत. अशा स्थितीत मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाला प्रदर्शित करणाऱया चित्ररथाची निवड न झाल्यास पुन्हा एकदा राजकीय वाद उभा ठाकू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)