केजरीवालांचे उपोषण पुढे ढकलले 

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले बेमुदत उपोषण पुढे ढकलले आहे. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी त्यांनी येत्या 1 मार्च पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या गंभीर स्थितीत आपण एक देश म्हणून एकसंध राहिले पाहिजे असे त्यांनी आपल्या ट्‌विटर संदेशात नमूद केले आहे.

हवाईदलाच्या जवानांनी पाकिस्तानवर केलेल्या धाडसी कारवाईचेही त्यांनी कौतुक केले असून हवाईदलाच्या शौर्याला त्यांनी सलाम केला आहे. पाकिस्तानवर कारवाई करून भारतीय हवाईदलाने आपल्याला अभिमानास्पद वाटावी अशी कारवाई केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी मोठे आंदोलन केजरीवालांनी हाती घ्यायचे ठरवले होते. त्यासाठी ते स्वत: बेमुदत उपोषणालाही बसणार होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)