बदनामीच्या खटल्यातून केजरीवाल निर्दोष

नवी दिल्ली – ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यावतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यातून केजरीवालांची आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. दिल्लीचे मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी समर विशाल यांनी आज त्यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

सन 2012 साली दिल्लीत केजरीवालांनी वीज दरवाढीच्या विरोधात उग्र आंदोलन केले होते. त्या आंदोलनाच्यावेळी केजरीवालांनी शीला दीक्षित यांच्या विरोधात अवमानकारक भाषा वापरली होती असा दावा करीत दीक्षित यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार पवन खेरा यांनी केजरीवालांवर हा बदनामीचा खटला दाखल केला होता. केजरीवालांवर त्यावेळच्या आंदोलनाच्या अनुषंगाने अन्यही खटले अद्याप प्रलंबीत आहेत. तथापि त्यांना या खटल्यातून मात्र दिलासा मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)