निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्या प्रकरणात केजरीवालांची निर्दोष मुक्तता 

नवी दिल्ली: २०१३ मधील दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपामधून दिल्ली न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची निर्दोष सुटका केली  आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी याबाबत निर्णय देताना “एखाद्या व्यक्तीचा रहिवाशी पत्ता हा मतदान पत्त्याशी विसंगत असणे हे तो व्यक्ती मतदान पत्त्यावरील रहिवाशी नसल्याचे सिद्ध करू शकत नाही.” असे मत नोंदवले.
तत्पूर्वी अरविंद केजरीवाल हे गाझियाबादचे रहिवाशी असून त्यांनी दिल्ली मधून निवडणूक लढवता यावी यासाठी जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली असे आरोप लावण्यात आले होते. “एखाद्या व्यक्तीचा रहिवाशी पत्ता हा त्या व्यक्तीचा साधारणपणे मुक्काम असलेल्या ठिकाणाचा पत्ता असतो, रहिवाशी पत्ता हा कायमस्वरूपी पत्ता असावाच असे नसल्याने केजरीवालांनी प्रतिज्ञापत्रात घोषित केलेला रहिवाशी पत्ता चुकीचा ठरवता येणार नाही.” असे निरीक्षण अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी नोंदवले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)