सीबीआय प्रकरणी केजरीवाल, सिन्हांनी घेतले तोंडसुख 

नवी दिल्ली  – सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा यांनी राफेल गैरव्यवहार प्रकरणात काही कागदपत्रे मागवून घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यामुळेच त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची कारवाई करण्यात आल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. तशा स्वरूपाचा स्पष्ट आरोप एका संकेत स्थळाने केला असून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही ट्‌विटरवर तशा स्वरूपाचा संदेश प्रसारीत केला आहे.

केजरीवाल यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे की अलोक वर्मा यांना हटवले जाण्याशी राफेल गैरव्यवहाराशी काही संबंध असावा काय? अलोक वर्मा हे राफेलची चौकशी सुर करणार होते त्यामुळे मोदी अडचणीत आले असते अशी शंका त्यांनी या प्रकरणात व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अलोक वर्मा प्रकरणाची दिल्लीत मोठीच चर्चा सुरू झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशांत भुषण, यशवंत सिन्हा इत्यादींनी राफेल प्रकरणाची गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सीबीआयकडे केली आहे. तशातच आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनीहीं राफेल प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे केली असून सीबीआयने त्यांचे हे पत्र अधिकृतपणे या विषयाच्या रेकॉर्डवर घेतले आहे. त्या अनुषंगाने वर्मा यांनी चौकशीची हालचाल सुरू केल्यानेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची वदंता आहे. यातील राकेश अस्थाना हे गुजरात केडरचे अधिकारी आहेत आणि त्यांची मोदींशी जवळीक आहे असेही सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन पोहचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)