केजरीवाल यांची भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे 

प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकास विरोध 
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी भाजप आणि एनडीए आघाडीची सरकार असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून प्रस्तावित इलेक्‍ट्रीसिटी कायद्यातील दुरुस्त्यांच्या गंभीर परिणामांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली आहे. केजरीवाल यांनी अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्त्र, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, बिहार, नागालॅन्ड आणि मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रे पाठवली आहेत.
आपण भाजप आघाडीशी संबंधित आहात, हे मला माहिती आहे. प्रस्ताविक इलेक्‍ट्रीसिटी दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात बोलणे आपल्याला अवघड आहे. मात्र आपण पंतप्रधानांची भेट घ्यावीत आणि त्यांना या दुरुस्तीतील धोक्‍यांची जाणीव करून द्यावीत, अशी विनंती केजरीवालांनी या पत्राद्वारे संबंधित मुख्यमंत्र्यांना केली आहे. केजरीवाल यांनी ईशान्य दिल्लीतील एका सभेमध्ये बोलताना आपण अशी पत्रे पाठवणार असल्याचे शनिवारीच जाहीर केले होते.
मोदी सरकार हिवाळी अधिवेशनामध्ये वीजदरवाढीविषयीचे दुरुस्ती विधेयक मांडणार आहे. या विधेयकामुळे टप्प्याटप्प्याने अनुदान काढून टाकले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडेच मोडणार आहे. वीजेचे बील भरणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात राहणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीत वीजेच्या वापरासाठी 200 युनिटमागे 1 रुपया प्रति युनिट दराने आकारणी केली जाते. मात्र ज्यांना 400 युनिटचा वापर आहे, त्यांना 2.50 रुपये दराने आकारणी होते. मात्र प्रस्तावित दुरुस्ती विधेयकानंतर दोन्ही श्रेणींना 7.50 रुपये प्रति युनिट आकारणी केली जाईल. त्यामुळे 90 टक्के वीज ग्राहकांना याचा मोठा फटका बसेल, असे केजरीवाल म्हणाले.
या संदर्भात पुढील आठवड्यात काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आपण स्वतः जाणार आहोत. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे पिनारयी विजयन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची आपण भेट घेणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)