दहा कोटी डिपॉझिट ठेवा मग विदेशात जा : सर्वोच्च न्यायालयाची कार्ती चिदंबरम यांना सुचना

नवी दिल्ली : मनि लॉंड्रिंग प्रकरणात सध्या ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या कार्ती चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे विदेशात जाण्यासाठी अनुमती मागितली होती. त्या अर्जावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा कोटी रूपयांचे डिपॉझीट कोर्टाकडे ठेवण्याची सुचना केली आहे. डिपॉझीट भरा आणि विदेशात जा असेच कोर्टाने त्यांना सांगितले आहे. एअरसेल मॅक्‍सिस आणि आयएनएक्‍स मिडीया घोटाळा प्रकरणात त्यांनी 5,6,7 आणि 12 मार्च रोजी ईडी समोर उपस्थित राहण्याची सुचनाही कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना केली आहे.

10 ते 26 फेब्रुवारी दरम्यान तुम्ही कोठेही जाऊ शकता पण या प्रकरणातील तपास कामात सहकार्य करा अशी सुचनाही कोर्टाने कार्तींना केली आहे. विदेशातून आपण परत येऊ आणि तपास अधिकाऱ्यांना सहकार्य घेऊ अशी लेखी हमी आपण द्यावी अशी सुचनाही कोर्टाने कार्तींना दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)