हिवाळ्यामुळे केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद

file photo

केदारनाथ  – हिवाळा श्रृतू निमीत्त हिमालयातील केदारनाथ मंदिराचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले आहेत. काल विधीपुर्वक हे मंदिर बंद करण्याचा परंपरागत कार्यक्रम झाला.पहाट साडे चार वाजल्यापासून पुजा विधी सुरू झाला आणि आज सकाळी साडे आठ वाजता हे दरवाजे बंद करण्यात आले.

केदारनाथ मंदिर हे देशविदेशातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे मुख्य पुजारी टी गंगाधर लिंग यांनी केदारनाथ मंदिरातील शिवाची मुर्ती हलवली. हिवाळ्याच्या काळात ती उखीमठ येथील ओंकारेश्‍वरमंदिरात ठेवली जाते. ही मुर्ती उखीमठ येथे 11 नोव्हेंबरला पोहचेल.

हिवाळा संपल्यानंतर मंदिर पुर्ववत उघडले जाते. भगवान शंकराचे हे देवस्थान बारा जोर्तिलिंगातील एक समजले जात असल्याने भाविकांमध्ये या मंदिराला विशेष महत्व आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)