केदारनाथ’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

हायाकर्टाने याचिका फेटाळली

मुंबई: सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांची प्रमुख भूमीका असलेल्या केदारनाथ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवसआधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून प्रदर्शनाला विरोध करणारी जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या, शुक्रवारी (7 डिसेंबर) रोजी देशात सर्वत्र सिनेमा प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला असून चित्रपटातील कलाकारांसह, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

-Ads-

हिंदूं धर्मातील सर्वोच्च स्थान असलेल्या चारधामांपैकी एक असलेल्या पवित्र अशा केदारनाथ या नावाने लव्हस्टोरीवर आधारीत चित्रपट कसा काढला जातो? असा सवाल उपस्थित करून चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणारी जनहित याचिका ऍड. रमेशचंद्र मिश्रा आणि ऍड. प्रभाकर त्रिपाठी यांच्यावतीने उच्च न्यायालयात केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी ऍड. रमेशचंद्र मिश्रा यांनी या चित्रपटात हिंदूच्या पवित्र अशा मंदिरावर आधारित दाखविण्यात आलेली लव्हस्टोरी चुकीची आणि धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचा आरोप केला. तसेच निर्मात्यांतर्फे प्रसिध्द झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरलाही आक्षेप घेतला. यावेळी निर्मात्यांच्या वतीने ऍड. प्रसाद ढाके-फाळके यांनी सर्व आक्षेप फेटाळून लावले. सेन्सॉर र्बांर्डाने जे काही भाग वगळायच्या सुचना केल्या आहेत ती आक्षेपार्ह दृष्ये वगळण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा केला.

तसेच ही एक साधी सरळ प्रेमकथा असून यातील पात्र काल्पनिक असल्याचे सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या सिनेमामुळे कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. असे स्पष्ट केले. सेन्सार बोर्डानेही चित्रपटातील आक्षेप घेण्यात आलेली दृष्ये वगळल्यानंतरच त्यांन प्रमाणपत्र दिल्याची न्यायालयात माहिती दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)