#INDvWI : अखेरच्या दोन सामन्यासाठी केदारचा संघात समावेश

नवी दिल्ली – भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला  तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यानंतर केदारनेही आपल्याला का वगळले, ते कळाले नसल्याचे सांगितले होते.

मात्र, वेस्ट इंडिजविरूध्दच्या चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी केदारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूध्द होणाऱ्या टी20 मालिकेत मात्र त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, वेस्टइंडिज विरूध्द राहिलेल्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये केदार जाधव याला वगळण्यात आले होते. मात्र आपल्याला संघातून का वगळले याची त्याला माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी केदारचा तंदुरस्तीचा इतिहास पाहता त्याला संघातून वगळण्यात आले असल्याचे सांगितले होते.

संघातून का वगळले हे कळालेच नाही : केदार जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)